Marathwada Political News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतांना दिसत आहेत. (Danve On Bawankule News) राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांसोबत सत्तेत आल्यापासून बावनकुळे यांच्या टीकेला अधिकच धार आली आहे. उद्धव ठाकरे यांना निशाणा करत ते सातत्याने टीका करत असतात. त्याला ठाकरे गटाकडून देखील जशास तसे उत्तर दिले जात आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत `आमचा नेता आजही बलशाली आहे, २०२४ च्या गप्पा काय झोडता? आधी महापालिकेच्या निवडणूक लावा`, असे म्हणत आव्हान दिले आहे. ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे, अशी टीका बावनकुळे यांनी नुकतीच केली. यावर दानवे यांच्याकडून लगेच तिखट प्रतिक्रिया आली. (Chandrashekahr Bawankule) बावनकुळे यांच्या ट्विटला त्यांनी देखील ट्विटने खरमरीत उत्तर दिले.
दानवे म्हणाले, ज्या माणसाकडे पक्ष नाही, चिन्ह नाही अशा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाची इतकी वाट तुम्हाला पहावी लागते, बावनकुळेजी. किती ती आतुरता तुमची ? याचे कारण एकच. हा आमचा नेता आजही तितकाच बलशाली आहे! २०२४ च्या गप्पा काय झोडता? आपल्या क्षमतांवर एवढाच दृढ विश्वास असेल तर महापालिकेच्या लांबलेल्या निवडणूका लावा.(Shivsena) लोक कोणाच्या बाजूने कौल देतात ते कळेलच, अशा शब्दात दानवे यांनी बावनकुळे यांना सुनावले. भाजपकडून होणाऱ्या प्रत्येक टीकेला अंबादास दानवे हे प्रत्युत्तर देतांना दिसत आहे. सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून आणि सभागृहाबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून.
काय म्हणाले होते बावनकुळे..
राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय? तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं.
औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.