Ajit Pawar In Pune : अमित शाहांच्या कौतुकाने पोटात दुखणाऱ्यांसाठी अजितदादांचा उतारा

Sugar Commissioner Meeting : पुण्यात साखर आयुक्तांच्या बैठकीत राज्यातील कारखान्यांच्या प्रश्नांवर चर्चा
Ajit Pawar, Amit Shah
Ajit Pawar, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुण्यात तोंड भरून कौतुक केले; त्यावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चे रंगल्या. शाहांनी जाहीर कार्यक्रमात दाखविलेल्या प्रेमावर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली आणि माध्यमाच्या प्रतिनिधींना सुनावले. 'शाहांनी कौतुक केले; त्यात विचारण्यासारखे काय आहे', असा सवाल करीत अजितदादांनी पत्रकारांना प्रश्‍न केला. या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दुसरा नेता दिसत नाही. लोकांची कामे मार्गी लावण्याच्या हेतुने या सरकारमध्ये सामील झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (Latest Political News)

Ajit Pawar, Amit Shah
Ashish Shelar ON Uddhav Thackeray : ठाकरे कितीही विषारी बोलत असले तरी त्यांच्या घरी साप कोणी सोडू नये ; शेलारांचा टोला

पुण्यात आलेले केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सर्व साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करण्यास सांगितले आहे. त्यासाठी कारखान्यांना सरकार मदत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार आयुक्तांच्या बैठकीनंतर जाहीर केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारून शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

अजित पवारांनी सोमवारी पुण्यात साखर आयुक्तासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रश्नांसह इथेनॉल निर्मितीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी शिरूरमधील घोडगंगा साखर कारखान्यातील सुरू असलेल्या संपाबाबतही व्यवस्थापक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तेथील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती यावेळी पवारांनी दिली. संप सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Ajit Pawar, Amit Shah
Delhi Sewa Vidheyak: दिल्ली सेवा विधेयकावरून 'इंडिया'ची कसोटी; राज्यसभेत होणार घमासान

राहुल गांधींना खासदारकी परत मिळाली आहे. यावर विचारले असता अजित पवार संविधानाचा दाखल देत म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. संविधानानुसार हा निर्णय झालेला आहे. या संविधानाला आपण सर्व मान्य करत असल्याने या निर्णयाचे स्वागत आहे." या बैठकीनंतर अजित पवार शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जेजुरीकडे रवाना झाले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com