Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंचा पक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये खरंच 'शिल्लक सेना' ठरणार? माजी महापौर, नगरसेवक पदाधिकाऱ्यांचं इनकमिंग सुरूच!

Chhatrapati Sambhajinagar Municipal Elections : छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून माजी महापौर, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे शिंदे सेना व भाजपकडे पक्षांतर सुरू आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सत्ताधारी पक्षात जाण्याचा ओढा वाढला होता. कालांतराने हे प्रमाण इतके वाढले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 'शिल्लक सेना' अशी खिल्ली उडवली जाऊ लागली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आपली ताकद दाखवत पक्ष फुटीनंतरही नऊ खासदार निवडून आणले. शिल्लक सेना म्हणणाऱ्यांसाठी ही चपराक होती.

परंतू सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गेली अनेक वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आणि टप्प्याटप्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आऊटगोईंग सुरू झाले. सुरूवातीला याचा वेग कमी होता, पण महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होताच पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या अक्षरशः रांगा लागल्या.

माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिली पसंती दर्शवत उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याचा धडकाच लावला. ज्यांना शिंदेंच्या शिवसेनेतून शब्द मिळाला नाही त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून भाजपमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण तसे नगन्य. पण शिंदेंच्या शिवसेनेत स्पर्धा वाढू लागल्याने आता भाजपचा पर्यायही काही पदाधिकारी निवडत आहेत.

Shivsena UBT News
Mahayuti Politics: ‘ऑपरेशन लोटस’चा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला झटका?; भाजप स्वबळाच्या तयारीत?

गेल्या चार-पाच दिवसात उद्धव ठाकरेंच्या पक्षातून चार माजी नगरसेवक, एक माजी महापौर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. तर या आऊटगाईंगमध्ये भाजपच्या गळालाही दोन माजी नगरसेवक लागले. या सगळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात एक प्रवेश झाला, ते म्हणजे माजी महापौर रशीद मामू याच्या रुपाने एक मुस्लिम चेहरा लाभला. आता याचा त्यांना फायदा होतो, की मग हिंदुत्व सोडले या विरोधकांच्या आरोपाला बळ मिळते? हे पहावे लागेल.

Shivsena UBT News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत धनुष्यबाण, कमळ की मशाल? शिरसाट, सावे, दानवेंमध्ये टक्कर!

महापालिकेच्या इतिहासात म्हणजे 1988 पासून 2020 पर्यंत शिवसेनेने 14 महापौर दिले. त्यातील आठजणांनी आतापर्यंत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यासोबतच अनेक माजी नगरसेवकांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. यात आठ माजी महापौरांचाही समावेश आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्यावर ही पदे मिळाली त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आता फक्त तीन माजी महापौर शिल्लक आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) गेलेल्या माजी महापौरांमध्ये नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, कला ओझा, अनिता घोडेले, किशनचंद तनवाणी, विमल राजपूत, विकास जैन, गजानन बारवाल, आमदार प्रदीप जैस्वाल यांचा समावेश आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजूनही असलेल्या माजी महापौरांमध्ये सुदाम सोनवणे, शीला गुंजाळ, रुक्मिणी शिंदे यांची नावे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com