Parbhani Politics : ठाकरेंची साथ सोडू नये म्हणून मुस्लिम कार्यकर्त्याचा फोन : खासदार जाधवांच्या उत्तराने राजकारणात नवा ट्विस्ट

Shivsena UBT MP sanjay jadhav viral call Over shivsena shinde group entry : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव सध्या शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे चर्चेत आले आहे.
Shivsena UBT MP sanjay jadhav
Shivsena UBT MP sanjay jadhavsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खासदार संजय जाधव यांच्या व्हायरल फोन कॉलमुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.

  2. जाधव यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने आणि मातोश्री बैठकीला गैरहजर राहिल्याने संशय अधिक वाढला आहे.

  3. त्यांच्या सूचक वक्तव्यामुळे शिंदे शिवसेनेत जाण्याच्या शक्यतेवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Parbhani News : 'खासदार साब, हमने तुमको वोट करे, तुम्हारा सगा भाई तुम्हारे खिलाफ था, अब वो मुसलमानो के विरोध मे बोल रहा है. साब तुम शिंदेंकी शिवसेना मत जाओ', असा फोन परभणी भाजी मार्केटमधील एका मुस्लिम कार्यकर्त्याने खासदार संजय जाधव यांना केला. या संभाषणाची कथित ऑडिओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. संबंधित कार्यकर्त्याला 'अभी तो मै गया नही, आगे वक्त वक्त की बात है' असे उत्तर जाधव यांनी दिले आहे. पण आता त्यांच्या या उत्तराने पक्षांतराच्या चर्चेला हवा दिल्याचे या संभाषणातून समोर आले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चांना सध्या सर्वत्र उधाण आले आहे. अशातच जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्याने या चर्चा अधिकच वाढल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच दिल्लीत जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांना मतदान केलेल्या मुस्लिम मतदारांमध्ये चल बिचल वाढली आहे. जुबेर डायमंड नावाच्या एका भाजी मार्केटमधील कार्यकर्त्याने संजय जाधव यांना फोन करून मुस्लिम मतदारांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास तोडू नका, असे आवाहन केल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

Shivsena UBT MP sanjay jadhav
Sanjay Jadhav News : ऑपरेशन टायगरची चर्चा, तरी ठाकरेंच्या खासदाराच्या भेटीगाठी सुरूच; रेल्वे प्रश्नासाठी मंत्र्यांना साकडे!

मुस्लिम समाजाने सगळ्यांचा विरोध पत्करत भाजपला विरोध केला. लोकसभेला तुम्हाला मतदान केले. तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधात होता, पण आम्ही तन-मन-धनाने तुमचे काम केले. आता तुम्हीच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मी तुम्हाला दोन-तीन दिवसापासून फोन करतोय पण तो बंद होता. यावर मै काय को शिंदे की शिवसेने में जाऊ, असे उत्तर संजय जाधव यांनी दिले. आमच्या समाजाने विधानसभा, लोकसभेला तुमचे काम केले, याची आठवण संबंधित कार्यकर्त्याने जाधव यांना करून दिली.

यावर माझ्यावर मुस्लिम समाजाने उपकार केलेत, तर मी पण मुस्लिम महापौर करत त्याची फेड केल्याचे संजय जाधव म्हणाले. मोदी-शहा ईडीची भीती दाखवून कोणालाही पक्षात प्रवेश करायला लावतात. पण तुम्ही दबावाला बळी पडू नका, तुम्ही शिवसेनेत गेले तर भाजप आम्हाला टार्गेट करेल. मग आम्ही थेट भाजपलाच मदत करू, त्याच्यांशी वैर कशाला घ्यायचे? असा इशाराही फोन करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्याने केला.

यावर माझे कोणते काळे धंदे आहेत, माझ्या मागे ईडी लागायला? अशा शब्दात खासदार जाधव यांनी त्या कार्यकर्त्याला सुनावले. मुस्लिम समाजाने निवडणुकीत मला केलेली मदत मी विसरलेलो नाही, ईडी-सीबीआयची भीती मला नाही, पण भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही? यावर कुछ भी हो सकता है, असेही जाधव म्हणाले. यावर वो कुछ भी हो, जाधव साब तुम शिंदेंकी शिवसेना मे मत जाओ, अशी विनंती सदर कार्यकर्त्याने केली. तसेच माझ्याशी बोलल्याबद्दल तुमचे आभार, असे म्हणत त्याने फोन ठेवला. या कथित ऑडिओ क्लीपची पुष्टी करता येत नसली तरी हे संभाषण सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Shivsena UBT MP sanjay jadhav
Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंचा परभणीचा 'वाघ'; शिंदेच्या ऑपरेशन 'टायगर'मध्ये अडकणार का?

FAQs :

Q1. संजय जाधव यांचा व्हायरल कॉल काय आहे?
👉 परभणीतील एका कार्यकर्त्याशी झालेल्या फोन संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे.

Q2. जाधव यांनी अमित शहा यांची भेट घेतली का?
👉 होय, त्यांनी अलीकडेच दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Q3. मातोश्री बैठकीला ते का गैरहजर होते?
👉 याबाबत अधिकृत कारण स्पष्ट नाही, पण यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Q4. जाधव शिंदे शिवसेनेत जाणार आहेत का?
👉 अद्याप अधिकृत घोषणा नाही, पण संकेत मिळत असल्याची चर्चा आहे.

Q5. या प्रकरणाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?
👉 महाराष्ट्रातील शिवसेना आणि इतर पक्षांमधील राजकीय समीकरणांवर याचा प्रभाव पडू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com