Uddhav Thackeray Video : "वाघाचं कातडं पांघरलेले लांडगे, गद्दार", ओमराजेंच्या होम ग्राऊंडवर ठाकरेंची तोफ धडाडली; म्हणाले, 'जर मला...'

Uddhav Thackeray Omraje Nimbalkar : मला जर यांची ही कृत्ये आधी माहीत असती, तर मी त्यांना उमेदवारीच दिली नसती. त्यामुळे या चुकीबद्दल मी धाराशीवच्या जनतेची हात जोडून माफी मागतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray addresses a public rally in Dharashiv, launching a sharp political attack on MP Omraje Nimbalkar.
Uddhav Thackeray addresses a public rally in Dharashiv, launching a sharp political attack on MP Omraje Nimbalkar.sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. धाराशीव येथील जाहीर सभेत त्यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले, "मी ज्यांना माझे दोन वाघ समजत होतो, ते प्रत्यक्षात वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे निघाले,"

ओमराजे निंबाळकर यांच्या भाषणाची नक्कल करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "भाषण करताना हे काय सांगायचे? माझा मोबाईल नंबर घ्या, मला कधीही फोन करा. पण मी स्वतः जेव्हा नंतर त्यांना फोन लावला, नंबर फिरवला, तेव्हा साहेबांनी माझा फोनच उचलला नाही! अशा माणसांचे करायचे काय?" असा संतप्त सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

पूर्वीच्या सभेत ओमराजेंनीच खंडोजी खोपडे आणि सुर्याजी पिसाळ यांच्या गद्दारीचा दाखला दिला होता, याची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले, "४०० वर्षे झाली तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला गेला नाही. मग आता तुमच्या कपाळावर लागलेला हा गद्दारीचा डाग कधी पुसला जाणार?"

मी माफी मागतो...

उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरून जनतेची जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, "गेल्या चार दिवसांत या लोकांची जी भयानक प्रकरणे माझ्या कानावर येत आहेत, ती ऐकून अंगावर काटा येतो. असा भयानक माणूस आपण इतकी वर्षे पोसला कसा? मला जर यांची ही कृत्ये आधी माहीत असती, तर मी त्यांना उमेदवारीच दिली नसती. मी त्यांना तिकीट दिले म्हणून तुम्ही त्यांना मतदान केले, त्यामुळे या चुकीबद्दल मी धाराशीवच्या जनतेची हात जोडून माफी मागतो,"

शेतकऱ्याचा एक रुपया मोलाचा...

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, "आज गद्दारांकडे माणसे उरलेली नाहीत, पण शिवसेनेला हरवण्यासाठी पैशाचा अमाप पाऊस पाडला जातोय. परंतु, धाराशीवच्या एका साध्या शेतकऱ्याने आपल्या कष्टाच्या घामाचा एक रुपया मला निधी म्हणून दिला होता. त्या प्रामाणिक शेतकऱ्याच्या एका रुपयाची किंमत या गद्दारांच्या हजार कोटींच्या खोक्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे."

कर्जमाफी अन् कर्जमुक्ती

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरताना उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्ती आणि कर्जमाफीतील फरक स्पष्ट केला. "आमच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची 'कर्जमुक्ती' केली होती, 'कर्जमाफी' नाही. माफी ही गुन्हेगाराची केली जाते. आमचा बळीराजा, शेतकरी हा अन्नदाता आहे, तो गुन्हेगार नाही. त्यामुळे अन्नदात्याला कर्जाच्या ऋणातून मुक्त करायचे असते, जी भूमिका आम्ही सत्तेत असताना प्रामाणिकपणे पार पाडली," असे सांगत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com