Shivsena UBT News : चंद्रकांत खैरेंसाठी उद्धव ठाकरे संभाजीनगरात 'या' दिवशी घेणार सभा..

Political News : उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करत बाजी मारल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या विशेषत: शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचे वेळापत्रक आखून घेतले आहे.
Uddhav Thackeray and Chandrakant Khaire
Uddhav Thackeray and Chandrakant KhaireSarkarnama
Published on
Updated on

Chhatrpati Sambhajinagar News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आपले सर्व 21 उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली. तर दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे अजून काही उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करत बाजी मारल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या विशेषत: शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचे वेळापत्रक आखून घेतले आहे.

त्यानुसार छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 10 मे रोजी संभाजीनगरात सभा घेणार आहेत. या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचार संपण्यापुर्वी एक दिवस आगोदर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होईल. या सभेची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. (Shivsena UBT News)

Uddhav Thackeray and Chandrakant Khaire
Kalyan Loksabha : 'कुवतीपेक्षा जास्त झेपत नाही', श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

या शिवाय जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 2019 च्या निवडणुकीत अवघ्या साडेचार हजार मतांनी शिवसेनेची ही जागा गेली होती. ती पुन्हा खेचून आणण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात वाद आणि कुरबुरी वाढल्या होत्या.

त्यावर ठाकरे यांनी मात करत दोघांचीही कानउघाडणी करत त्यांना कामाला लावले आहे. महानगरप्रमुख नेमणुकीवर जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी नाराज झाले होते, त्यांची खैरे यांनी मनधरणी केली. तसेच वरिष्ठ पातळीवरून तनवाणी यांना सबुरीने घ्या, असा सल्ला देण्यात आला. त्यामुळे सध्या तरी ठाकरे गटातील नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे. चंद्रकांत खैरे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे.

महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजून म्हणावे तसे कामाला लागलेले नाहीत. त्यांना सक्रीय करण्यासाठी येत्या काळात ठाकरे गटाला प्रयत्न करावे लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगरची जागा पुन्हा शिवसेनेकडून खेचून आणण्यासाठी उद्धव ठाकरे इच्छूक आहेत. गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. यावेळी मात्र या मतदारसंघावर भगवा फडकवत विजयाची मशाल पेटवायची, असा निर्धार ठाकरे गटाने केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी, बंडाळी आणि कुरबुरी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा दमच ठाकरे यांनी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना भरल्याची चर्चा आहे. एमआयएम, वंचित, महायुती आणि अपक्ष उमेदवारही निवडणुक रिंगणात उतरणार असले तरी संभाजीनगरची लढत महाविकास आघाडी- महायुती आणि एमआयएम अशी तिरंगी होण्याची अधिक शक्यता आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

Uddhav Thackeray and Chandrakant Khaire
Chandrakant Khaire News : 'महायुतीत मारामाऱ्या, संभाजीनगरात मशालच पेटणार' ; चंद्रकांत खैरेंचा दावा!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com