Omraje Nimbalkar Vs Ranajgajitsinh Patil: एकमेकांची 'लायकी' काढत पुन्हा एकदा भाजप आमदार अन् उद्धव ठाकरेंचा खासदार भिडला

Dharashiv News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातलं राजकारण आरोप–प्रत्यारोपांच्या फैरींनी पुन्हा एकदा तापवण्याची शक्यता आहे. विकासकामांच्या निमित्तानं सुरु झालेले हे दावे-प्रतिदावे आता विकासकामं आणि निधीपर्यंतच मर्यादित न राहता एकमेकांना आव्हानं आणि राजकीय अस्तित्वापर्यंत पोहोचणार असल्याचं बोललं जात आहे.
Om Prakash Rajenimbalkar, Ranajagjitsinha Patil
Om Prakash Rajenimbalkar, Ranajagjitsinha PatilSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पिढ्यानं पिढ्या राजकीय अन् कौटुंबिक वाद धुमसतो आहे. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर (Om RajeNimbalkar) यांच्यात पुन्हा एकदा विकासकामं आणि निधीवरुन राजकीय वाद तापला आहे.

धाराशिव शहरातील तब्बल 140 कोटी रुपयांच्या विकास निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण वातावरण ढवळून निघालं आहे.

आमदार राणा जगजितसिंह पाटील (RanaJagjitsinha Patil) म्हणाले,विरोधकांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात द्यावेत. प्रशासन त्यावर लेखी उत्तर देईल. उगीच हवेत गोळ्या झाडण्यात अर्थ नाही. विरोधक काय लायकीचे आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. महाविकास आघाडीने मागितलेल्या नार्को टेस्टच्या मागणीवरही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,ज्यांना नार्कोटिक्सची इतकी माहिती आहे, त्यांनीच स्वतःची टेस्ट करून घ्यावी.आपण समोरासमोर चर्चा करूया, असं खुलं आव्हानही पाटील यांनी खासदार ओमराजेंना दिलं.

भाजप नेते राणा जगजितसिंह यांनी धाराशिव शहरातील विकासकामं तब्बल 18 महिने रखडल्यावरही रोखठोक भाष्य केलं होतं. ते म्हणाले, झारीतील शुक्राचार्य कोण आहेत,याचा पर्दाफाश योग्यवेळी योग्य लोक करतील असा हल्लाबोलही त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केला होता.

Om Prakash Rajenimbalkar, Ranajagjitsinha Patil
Ravindra Dhangekar: चंद्रकांत पाटलांवर केलेल्या आरोपांमुळं धंगेकर अडचणीत येणार? कोर्टाने घेतला महत्वाचा निर्णय

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आमदार राणा पाटलांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, लायकी ही पैशावर तपासायची नसते.लोकांचे शोषण करून,नेरुळमध्ये धाराशिव महाविद्यालय नेऊन तसेच गोरगरीब शेतकऱ्यांचे आणि तेरणा ट्रस्ट लुबाडून जी संपत्ती कमवली आहे, त्यावर लायकी मोजली जात नाही. लायकी ही माणसाच्या कर्तृत्वात आणि वागण्यात असते असा टोलाही निंबाळकर यांनी राणा पाटलांना लगावला.

ते म्हणाले, शरद पवारांनी तुम्हाला 40 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ठेवले आणि त्यांच्या जाण्यानंतर तुम्ही एका रात्रीत पक्ष बदलला. आम्ही मात्र उद्धव ठाकरे यांच्या अडचणीच्या काळातही सोबत उभे आहोत.हा आमच्यात आणि पाटील कुटुंबातला मोठा फरक आहे. आमने सामने चर्चेसाठी कधी ही यायला तयार असल्याचं आव्हानही ओमराजेंनी यावेळी राणा पाटलांना दिलं.

Om Prakash Rajenimbalkar, Ranajagjitsinha Patil
Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील पुन्हा पत्रकाराच्या भूमिकेत? सलग दोन पराभवानंतर जुन्या कामात मन रमवणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातलं राजकारण आरोप–प्रत्यारोपांच्या फैरींनी पुन्हा एकदा तापवण्याची शक्यता आहे. विकासकामांच्या निमित्तानं सुरु झालेले हे दावे-प्रतिदावे आता विकासकामं आणि निधीपर्यंतच मर्यादित न राहता एकमेकांना आव्हानं आणि राजकीय अस्तित्वापर्यंत पोहोचणार असल्याचं बोललं जात आहे. ओमराजे आणि राणा पाटील हे दोघेही पुन्हा एकदा आमने–सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com