Umarga-Lohara Assembly Election : ज्ञानराज चौगुले आमचे ओपनिंग बॅट्समन : श्रीकांत शिंदे

Umarga-Lohara Assembly Election : माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पानजिक पर्यटनस्थळ निर्माण करणार
Umarga Lohara  Assembly
Umarga Lohara AssemblySarkarnama
Published on
Updated on

Umarga-Lohara Assembly Election : आमदार ज्ञानराज चौगुले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीममधील ओपनिंग बॅट्समन आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ते विजयाचा चौकार मारणार असल्याने त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

शहरातील लोहारा हायस्कूलच्या मैदानावर शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता.१५) आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी सभापती जितेंद्र शिंदे, भाजपाचे राहुल पाटील, अभय चालुक्य, मराठवाडा युवा सेना निरीक्षक किरण गायकवाड, रिपाइंचे मराठवाडा सचिव हरीष डावरे, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, सुधीर पाटील, किशोर साठे, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, रिपाइं तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, मुस्लिम धर्मगुरू अबुलसाहेब कादरी, माधव पवार, शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, राजू पाटील, नगराध्यक्ष वैशाली खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Umarga Lohara  Assembly
Pankaja Munde: "खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले, तुमचीच नजर लागली..." पंकजाताईंना पराभवाचं शल्य!

बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी औद्योगिक वसाहात निर्माण केली जाणार आहे. माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पानजिक पर्यटनस्थळ निर्माण करणार असल्याचे सांगून महायुतीने मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली, मात्र विरोधकांनी या योजनेची टिंगल केली.

परंतु, टिंगल करणाऱ्यांना फक्त 'माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी' एवढच माहीत आहे. त्यांना या १५०० रूपयाचे महत्व काय समजेल? असा सवाल करून महायुती सरकारकडे देना बँक आहे, लेना बँक नाही, असा टोला खासदार शिंदे यांनी लगावला.

यावेळी परवेज तांबोळी, शिवराज चिनगुंडे, प्रताप लोभे, अमोल पाटील, श्रीरंग पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com