
Beed News: सरपंच संदीप देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मीक कराड हाच आहे, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. या सगळ्या लोकांचे सीडीआर तपासले तर ही गोष्ट आणि वाल्मीक कराड याचा या हत्येशी असलेला संबंध स्पष्ट होईल. तरीही वाल्मीक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल का केला जात नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार (Sandeep Kshirsagar) संदीप क्षीरसागर यांनी केला.
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि संदीप क्षीरसागर हे मुंबईतील मंत्र्यांच्या सह्याद्री बंगल्यावर डील करतात, नोटा मोजत बसतात, असा आरोप करत त्याचे फोटोही आता समोर आल्याचा दावा संदीप क्षीरसागर यांनी केला. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे केवळ धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे घडत आहे. त्यामुळे नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे.
वाल्मीक कराडला फाशी झाल्याशिवाय बीडची जनता आणि आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही संदीप क्षीरसागर यांनी दिला. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या विष्णू चाटे यांनी केली आणि विष्णू चाटेचे कनेक्शन वाल्मीक कराड याच्याशी होते. त्यामुळे वाल्मीक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे या मागणीचा पुनरुचारही संदीप क्षीरसागर यांनी केला.
वाल्मीक कराड याला अटक झाल्यानंतर सरपंच संदीप देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपासही अडकल्यासारखा वाटतोय, असे संदीप क्षीरसागर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले. धनंजय देशमुख यांनी मस्साजोग येथे पाण्याच्या टाकीवर चढून सुरू केलेले आंदोलन हा सरकारी तपास यंत्रणेच्या विरोधातील संताप आहे.
जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रीपदावर आहे तोपर्यंत सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास नीट होऊ शकत नाही, असा आरोपही संदीप क्षीरसागर यांनी केला. वाल्मिक कराड हा खोटे गुन्हे दाखल करण्यात पटाईत आहे, तो शरण आल्यानंतर झालेली अटक आणि त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर सरंपच संतोष देशमुख यांच्या खूनाचा तपास थंडावल्याचा दावाही क्षीरसगार यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.