Georai Assembly Constituency : सिंदफना नदीच्या पाणलोट क्षेत्र विकासासाठी संधी द्या!

Give a chance to develop the Sindafna catchment area, appeals Vijay Singh Pandit : गोदावरी नदी प्रमाने सिंदफना नदीवर ईटकूर, अंकुटा, टाकळगाव, खुंड्रस, औरंगपुर, नाथापूर येथील बंधारे करण्यासाठी शिवछत्र परीवाराकडेच आमदारकी पाहिजे. म्हणून येत्या 20 तारखेला मला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
Georai Assembly Constituency News
Georai Assembly Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : गेवराई विधानसभा मतदारसंघ हा उत्तरेस गोदावरी नदी व दक्षिणेस सिंदफना नदी यांच्या दरम्यान वसलेला आहे. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातील विकासाप्रमाणेच सिंदफना नदीच्या पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठी मला एक वेळा संधी द्या, असे आवाहन करत त्या संधीचे मी सोने करेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी दिला.

विजयसिंह पंडित यांनी पिंपळनेर सर्कल मधील चव्हाणवाडी, कुक्कडगाव खुंडरस, आडगाव, गुंजाळा, वडगाव, गुंदेवाडी व गुंधा या गावातील कॉर्नर बैठका घेतल्या. गेवराई मतदार संघाचा विकास करण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी फक्त शिवछत्र परीवाराकडेच आहे. (Beed) त्यामुळे गोदावरी नदी प्रमाने सिंदफना नदीवर ईटकूर, अंकुटा, टाकळगाव, खुंड्रस, औरंगपुर, नाथापूर येथील बंधारे करण्यासाठी शिवछत्र परीवाराकडेच आमदारकी पाहिजे.

Georai Assembly Constituency News
Beed Assembly Constituency : अंतरमनाची हाक; क्षीरसागर काकांची डॉ. योगेशला साथ

म्हणून येत्या 20 तारखेला मला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. (NCP) दरम्यान, यावेळी खुंरडस येथील प्रल्हाद निर्मळ, श्रीराम गुरव, हनुमान निर्मळ, संतोष गाडे, नारायण निर्मळ, बळीराम निर्मळ, वसंत खंडागळे, सदाशिव निर्मळ, सुभाष दळवी, रामप्रसाद हटवटे, महादेव निर्मळ, राधाकिसन निर्मळ, मोहन निर्मळ, विकास निर्मळ, महादेव वैद्य यांनी विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

Georai Assembly Constituency News
NCP Ajit Pawar : मलिकांनंतर अजितदादांच्या आणखी एका नेत्याचं मोठं विधान; ' सरकार आणण्यासाठी गणित जुळत नसेल तर...'

आडगाव येथील सरपंच सुरेशराव बनगर, माजी सरपंच पांडू तात्या देवकर, युवा नेते नंदकिशोर बनगर, शुभम बनकर यांनीही विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयसिंह पंडित यांना विजयी करुन आपला लाडका प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला.

Georai Assembly Constituency News
Mahayuti And MVA : विधानसभा निवडणुकीत 'आश्वासनांची स्पर्धा'; पण आर्थिक स्थितीचे काय?

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील, बळवंत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य किशोर सुरवसे, पांडुरंग पठाडे, श्रीकिसन कदम, सुरेश घुमरे, गणेश तोडेकर, अण्णा देवगुडे, वशिष्ठ कुठे, जयदत्त शिंदे, तुळशीदास पवार, अशोक हाटवटे, प्रमोद मते, लक्ष्मण करांडे, कैलास गायवळ, भगवानराव देवडकर, कृष्णा प्रभाळे, प्रताप घुगे विनोद घुगे, नंदकिशोर मोरे, किरण लांडगे बाळनाथ मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Georai Assembly Constituency News
Georai politics : भाजप आमदाराला राष्ट्रवादीने घेतले फैलावर; ‘पराभवाच्या भीतीने रडू नका...लढून पडा’

दरम्यान, पंडित यांनी नुकताच गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे होनानाईक तांडा, फुलानाईक तांडा, लव्हारमळा तांडा (टाकरवन), हनुमान नगर, रामनगर, सेलगाव थडी, मानेवस्ती, कवडगाव, रिधोरी आदी गावांतील ग्रामस्थ व मतदारांशी संवाद साधला. साधारण मे महिन्यात दुष्काळाच्या झळा, पाण्याचा तुटवडा यामुळे डोळ्या देखत शेतीतील ऊस व इतर पीक उध्वस्त होत होते.

Georai Assembly Constituency News
Mahayuti Politics : महायुतीतील शिंदे अन् अजितदादांचे उमेदवार एकमेकांविरोधात भिडणार

अमरसिंह पंडित यांनी पाठपुरावा केला व गोदावरीच्या डाव्या उजव्या दोन्ही कालव्यांमध्ये पाणी सोडले. या पाण्यामुळे या भागातील हजारो एक्कर ऊस जिवंत राहिला. दौऱ्या दरम्यान या भागातील लोकांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले. या दर्जात्मक कामासाठीच राज्याच्या सर्वोच्च सभागृहात हक्काचा लोकप्रतिनिधी असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com