Market Committee News : आमदारांचे पुत्रप्रेम, सभापतीपदावर विक्रांत शिंदेंची वर्णी...

Marathwada Political News : आमदार शिंदे कोणाला संधी देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
Market Committee News
Market Committee NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : नांदेड जिल्ह्यातील लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर पुत्रप्रेम भारी ठरले. (Market Committee News) लोहा कृषी उत्तपन्न बाजार समितीवर वीस वर्षापासून असलेली सत्ता संपुष्टात आणत विरोधकांना चारीमुंड्या चीत करत आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बाजी मारली होती. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेहुणे असलेले श्यामसुंदर शिंदे यांनी त्यांची सत्ता उलथवून टाकली.

Market Committee News
Maratha Reservation News : जरांगेंची सरकारला अजून एक संधी ; चर्चेला या, एकदाचं आरक्षण द्यायचं का नाही ते सांगा ?

बाजार समितीत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर ते सभापदीपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. (Nanded) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगांवकर यांनी बिलोली बाजार समितीच्या सभापतीपदी आपल्या पुतण्याची वर्णी लावली होती. आता लोहा बाजार समितीमध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsunder Shinde) यांनी पुत्रप्रेमापोटी विक्रांत शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लावली आहे.

तर उपसभापतीपदावर काँग्रेसचे संचालक अण्णाराव पवार यांची निवड करण्यात आली आहे. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यात लक्षवेधी व प्रतिष्ठेची ठरली होती. (Marathwada) ही निवडणूक खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचे महायुतीचे पॅनल व त्यांचे मेहुणे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये झाली होती.

या अटीतटीच्या निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे यांनी बाजी मारत एकतर्फी विजय संपादन केला आहे. निवडणुकीत शिंदे यांचे चिरंजीव विक्रांत शिंदे हे निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. या बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता आल्याने आघाडीचा सभापती व उपसभापती होणार हे निश्चित होते.

आमदार शिंदे कोणाला संधी देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सभापतीपदासाठी विक्रांत शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पण यात बाजी मारली ती विक्रांत शिंदे यांनी. सभापती, उपसभापती निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. सभापतीपदासाठी विक्रांत शिंदे तर उपसभापतीपदासाठी काँग्रेचे अण्णाराव पवार यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे हि निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com