Vilas Bhumre : आमदार विलास भुमरेंवर पैठणसह आणखी दोन मतदारसंघाची मोठी जबाबदारी!

Shivsena Chhatrapati Sambhajinagar : राजेंद्र जंजाळ यांच्याकडे जिल्हाप्रमुख म्हणून शहरातील मध्य, पुर्व, पश्चिम मतदार संघाची जबाबदारी आहे. तर भरत राजपूत यांच्याकडे गंगापुर, वैजापुर, कन्नड हे मतदारसंघ आहेत.
MLA Vilas Bhumre Paithan News
MLA Vilas Bhumre Paithan NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. आमदार विलास भुमरेंवर पैठणसह आणखी दोन मतदारसंघाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली.

  2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी हा रणनीतिक निर्णय घेतला.

  3. या निर्णयामुळे शिंदे गटाची निवडणूक तयारी अधिक बळकट होणार असल्याची चर्चा आहे.

योगेश पायघन

Shivsena News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनेकडून सोपवण्यात आली आहे. पैठण या स्वत:च्या मतदारसंघासह फुलंब्री, सिल्लोडमध्ये संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची रणनिती आखण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या नव्या बदलामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघावर वाॅच ठेवण्याचा प्रयत्न आहे की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

पुर्वी या मतदार संघाची जबाबदारी असलेल्या रमेश पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत फुलंब्रीमधून महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्याविरोधात उमेदवारी कायम ठेवली होती. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तेव्हापासून रिक्त असलेल्या या पदावर आमदार विलास भुमरे यांच्यावर शिवसेनेचे (Shivsena) प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी त्या पदाची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आल्याचे पक्षाकडून मंगळवारी रात्री कळवण्यात आल्याचे पैठणचे (Paithan) आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाकडून आतापर्यंत दोन मेळावे नेते आणि मुख्य नेत्यांच्या मार्गदर्शनात झाले. त्यात प्रामुख्याने गाव आणि शाखा पातळीवर संघटनाबांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

MLA Vilas Bhumre Paithan News
Shivsena Vs Congress : विलासरावांच्या परफेक्ट नियोजनाने बाळासाहेब ठाकरेंना मात दिली... संभाजीनगरला शिवसेनेचा पहिला महापौर होता होता राहिला!

दरम्यान, सिल्लोडचे फारसे पदाधिकारी यात दिसले नाही. आमदार अब्दुल सत्तार सध्या संघटनेपासून काहीसे अलिप्त आहेत. केवळ एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात राहून ते इतरवेळी संघटनेच्या कार्यक्रमांकडे फिरकत नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थ निवडणुकीत पक्ष कोणतीही जोखमी पत्करू इच्छित नाही. मराठवाड्यात महायुतीचे एकमवे खासदार संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आले. या निवडणुकीची संपूर्ण यंत्रणा विलास भुमरे यांनीच हाताळली होती.

MLA Vilas Bhumre Paithan News
MLA Vilas Bhumre : पैठणचे संतपीठ हे 'संत विद्यापीठ' व्हावे! आमदार विलास भुमरे मतदारसंघाचा कायापालट करणार..

भुमरे यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा असलेला अनुभव, सभापती म्हणून केलेले काम पाहता एकनाथ शिंदे यांनी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्यावर सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या तीन मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. दरम्यान, राजेंद्र जंजाळ यांच्याकडे जिल्हाप्रमुख म्हणून शहरातील मध्य, पुर्व, पश्चिम मतदार संघाची जबाबदारी आहे. तर भरत राजपूत यांच्याकडे गंगापुर, वैजापुर, कन्नड हे मतदारसंघ आहेत.

महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असावा, याकडे स्वतः मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. निवडणुकीची सगळी सुत्रं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे असून इच्छुकांतून योग्य उमेदवार निवडणे, पदाधिकाऱ्यातून संभाव्य उमेदवारांसह निष्क्रिय पदाधिकाऱ्यांकडून जबाबदारी काढून त्या पदाची जबाबदारी अनुभवी, सक्रिय व्यक्तींकडे सोपवण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून हाती घेण्यात येणार असल्याची चर्चा पक्षात आहे.

FAQs

प्र.1. विलास भुमरेंना कोणती जबाबदारी देण्यात आली?
पैठणसह आणखी दोन मतदारसंघांची निवडणूक जबाबदारी सोपवण्यात आली.

प्र.2. ही जबाबदारी कोणाकडून देण्यात आली?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी दिली.

प्र.3. कोणत्या निवडणुकांसाठी ही जबाबदारी आहे?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी ही जबाबदारी सोपवली आहे.

प्र.4. या निर्णयामागील उद्देश काय आहे?
शिंदे गटाला स्थानिक निवडणुकांमध्ये अधिक बळकट करणे हा उद्देश आहे.

प्र.5. या निर्णयामुळे राजकीय समीकरणांवर काय परिणाम होऊ शकतो?
भुमरे यांचे स्थान बळकट होऊन शिंदे गटाला स्थानिक स्तरावर फायदा होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com