औरंगाबाद : गावपातळीवर काम करणाऱ्या शाखा प्रमुख, विभागप्रमुखासह इतर पदाधिकारी, शिवसैनिकांनी आपण हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत याची जाणीव ठेवावी. (Shivsena) ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे धोरण डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करा, असे आवाहन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत (Mp Vinayak Raut) यांनी केले.
महाविकास आघाडी सरकारचे काम पाहून भाजप अस्वस्थ आहे, म्हणून ते सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. आगामी प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे सांगतानाच राऊत यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कामाचे कौतुक केले. (Marathwada) सिल्लोड येथे आयोजित शिवसंपर्क अभियान प्रसंगी ते बोलत होते. या मोहिमे दरम्यान, सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील २१ पंचायत समिती गणनिहाय बैठका घेण्यात आल्या.
यावेळी मार्गदर्शन करतांना विनायक राऊत म्हणाले, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे काम कौतुकास्पद आहे. सरकार म्हणून लोकांच्या समस्या सोडविण्यासह विकास कामे कशी करावीत याचे धडे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व भागवत कराड यांनी सत्तार यांच्याकडून घेतले पाहिजे. सत्तार हे शिवसेनेचे कर्तव्यदक्ष मंत्री असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचे काम पाहून भाजपच्या गटात अस्वस्थता दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडावे यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. सत्तेसाठी महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपला धडा शिकविण्यासाठी गावकऱ्यांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या शिवसंपर्क अभियानातून पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात प्रत्येक संस्थेवर भगवा फडकत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील भगवाच फडकणार, असा दावा खैरेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.