Vinod Patil: छत्रपती संभाजीनगरमधून विनोद पाटलांची मोठी घोषणा; लोकसभेच्या रिंगणातून माघार अन् सूचक विधान

Chhatrapati Sambhjinagar: मागील अनेक दिवसांपासून महायुतीचा छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार ठरत नव्हता. शिवाय ही जागा भाजपला जाणार की शिवसेनेला यावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता.
Vinod Patil
Vinod PatilSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhjinagar Lok Sabha Election 2024: मराठा आरक्षण याचिकाकर्ते, आंदोलक विनोद पाटील (Vinod Patil) यांनी अखेर छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे महायुती आणि शिंदेच्या शिवसेनेसमोरची मोठी कोंडी सुटली आहे. पाटील यांनी आज (24 एप्रिल) कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. तसेच या निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत न जाता आणि अपक्ष निवडणूक न लढवता आपली तटस्थ भूमिका असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

मागील अनेक दिवसांपासून महायुतीचा छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) उमेदवार ठरत नव्हता. शिवाय ही जागा भाजपला जाणार की शिवसेनेला यावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, अखेर संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली आणि सेनेने तिथे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र पुन्हा विनोद पाटील यांच्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. पाटील यांनी या मतदारसंघातून आपणाला उमेदवारी द्यावी, असा आग्रह केला होता. शिवाय ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अशातच आज त्यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, हे जाहीर करताना त्यांच्या मनातील खदखद मात्र दिसून आली आहे.

विनोद पाटील म्हणाले, संभाजीनगरमधून मी निवडणूक लढवावी यासाठी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी प्रयत्नदेखील केले, पण शहरातील सत्ताधारी 2 आमदार आणि एका खासदाराने माझ्या उमेदवारीला टोकाचा विरोध केला. तसेच मी ही निवडणूक लढावी असा आग्रह शहरवासीयांनी धरला होता. त्यामुळे मी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, असंही ते या वेळी म्हणाले.

Vinod Patil
Amit Shah : फडणवीस आणि शाह यांनी दिली शरद पवारांना माफीची लिस्ट....

मुख्यमंत्र्यांनी फोनवरून निवडणूक लढवण्यास सांगितलं

तसेच खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास सांगितलं होतं, कालही मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं झालं होतं, असा दावाही त्यांनी या वेळी केला. शिवाय मी अपक्ष निवडणूक लढवल्यास मी निवडून येऊ शकतो, पण निवडून आलो नाही तर कुणाला तरी पाडण्यासाठी उभा होता हा डाग मला लावून घ्यायचा नाही. शिवाय कुणाला फायदा व्हावा यासाठी मी माघार घेत नाही, असंही ते पाटील यांनी स्पष्ट केलं.

नाक रगडून लोकांची माफी मागतो

उद्यापासून लोकांच्या गाठीभेटी घेणार आहे. नाक रगडून लोकांची माफी मागणार, कारण मी सार्थ ठरलो नाही, असं म्हणत, "ज्यांची घर काचेची असतात त्यांनी लोकांच्या घरावर दगड मारू नयेत," असा इशाराही त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पाटील यांनी माघार घेतली असली तरी त्यांच्या मनातील खदखद मात्र दिसून आली आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com