Chandrakant Khaire On Bhumre : थोडं थांबा, भुमरे फक्त आठ दिवसांचे पालकमंत्री ; मग त्यांच्या मागे ईडी लागेल..

Marathwada : घटनेनूसारच न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील घटनाबाह्य सरकार कोसळेल.
Mla Sanipan Bhumre-Chandrakant Khaire News
Mla Sanipan Bhumre-Chandrakant Khaire News Sarkarnama

Shivsena : `थोडं थांबा, संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) फक्त आठ दिवसांचे पालकमंत्री आहेत. ८ दिवसांनी सुप्रीम कोर्टा निकाल आल्यावर काय होते ते पहा? इतके दिवस त्यांच्यामागे ईडी वगैरे नव्हती, पण आता लागेल`, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला. आदित्य ठाकरे कधी खोटं बोलत नाहीत, एकनाथ शिंदे खरंच मातोश्रीवर ढसढसा रडले होते, मला माहित आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला.

Mla Sanipan Bhumre-Chandrakant Khaire News
Aimim Reacation On Ncp in Karnataka : आता आम्हाला कुणी भाजपची बी टीम म्हणू नये..

शिंदे आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मातोश्रीवर रडले होते, असा दावा केला होता. यावर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका केली गेली. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पुन्हा त्या मुद्याला हात घालत एकनाथ शिंदे हे खरंच मातोश्रीवर येवून ढसाढसा रडले होते, हे मला माहित आहे, असा दावा केला.

खैरे म्हणाले, मुख्यमंत्री काय किंवा पालकमंत्री भूमरे काय किती दिवस राहणार आहेत. ८ दिवस थांबा सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर तुम्हाला दिसेलच. (Shivsena) संदीपान भुमरे आता फक्त आठ दिवसांचे पालकमंत्री आहेत. त्यांना काही माहित नाही, ते बिळात लपून बसले होते. त्यामुळे शिंदे रडले नव्हते हा भुमरेंचा दावा खोटा आहे.

पालकमंत्रीपद आणि सरकार गेल्यानंतर भुमरे यांच्या मागे ईडी लागण्याची शक्यता आहे. त्यांनी महागड्या गाड्या, १२ बीअरबार टाकले आहेत, त्यामुळे पद गेलं की त्यांच्या मागे ईडी लागले, असा इशारा देखील खैरे यांनी दिला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, राज्य हे घटनेनूसार चालंल पाहिजे, म्हणूनच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरेंनी राज्य घटनेचे आणि भारत मातेचे पूजन केले होते. त्यामुळे घटनेनूसारच न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील घटनाबाह्य सरकार कोसळेल, असा विश्वास देखील खैरे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com