Walmik Karad : वाल्मिक कराडची अडचण वाढणार? 6 तास बीड कारागृहात कसून तपासणी! पथकाच्या हाती काय लागले?

Beed Jail VIP Treatment Allegations: वाल्मिक कराड याला बीडच्या कारागृहात व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.त्यानंतर विशेष पथकाने आज बीड कारागृहाची तपासणी केली.
walmik karad
walmik karadSarkarnama
Published on
Updated on

Beed Jail News : बीड जिल्हा कारागृहात कैद असलेल्या वाल्मीक कराड व त्याच्या इतर साथीदार आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जाते, अशी तक्रार खासदार बजरंग सोनवणे, सुप्रिया सुळे, धनंजय देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

एवढेच नाही तर वाल्मीक कराड याला नागपूर कारागृहात हलवा, अशी मागणीही करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल गृहमंत्रालयाने घेतली असून आज बीड कारागृहातील या व्हिआयपी ट्रिटमेंट प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून दोन विशेष पथक बीड कारागृहात धडकले होते.

सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या पथकाने बीड कारागृहात चौकशी करून फोन काॅल्स डिटेल्स, तुरुगांतील सीसीटीव्ही फुटेज व इतर महत्त्वाची माहिती गोळा केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह हाय-प्रोफाइल कैद्यांना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप होताच प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत गुरुवारी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील दोन पथकांनी सकाळी अकरा वाजताच बीड कारागृहात दाखल झाले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या पथकाने कसून तपासणी केली. धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीत वाल्मीक कराडला फोन कॉल्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बेकायदेशीर सुविधा पुरविल्या जात असल्याचा खळबळजनक दावा केला होता.

walmik karad
NCP News : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; सुनेत्रा पवारांच्या टीकेचा निषेध करताना स्वतंत्र आंदोलन!

यानंतर 10 अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पथकाने कारागृहातील प्रत्येक अभिलेख, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि व्हिसी डेटा ताब्यात घेतला आहे. दरम्यान, ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी घोटाळ्यातील सुरेश कुटे, अर्चना कुटे, बबन शिंदे आणि मावेजा घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या सारखे हाय-प्रोफाइल कैदी बीड कारागृहात आहेत.

बीड कारागृहाचा कारभार आधीच संशयाच्या भोवऱ्यात आहे. सततच्या चौकशीमुळे त्रस्त झालेल्या कारागृह कर्मचाऱ्यांनी आता अ‍ॅलन फोन, कॅन्टीन आणि बाहेरील मुलाखतींची जबाबदारी घेण्यास थेट नकार दिला आहे. आम्हाला कोणत्याही चौकशीच्या फेऱ्यात अडकायचे नाही, त्यामुळे बिन महत्त्वाची ड्युटी द्या, असा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतल्याने अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

अहवालात काय?

बीड कारागृहात कैद्यांना राजकीय दबावाखाली व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, या आरोपांमुळे कारागृहाची आणि प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर प्रभारी कारागृह अधिक्षकांनी दोन दिवसापूर्वी लेखी निवेदन प्रसिद्ध करत कैद्यांना नियमानूसारच सुविधा पुरवल्या जात असल्याचा खुलासा केला होता. आता या पथकाच्या अहवालातून नेमके काय बाहेर येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

walmik karad
Valmik Karad: वाल्मिक कराडला बीडच्या तुरुंगात मिळतेय VIP ट्रिटमेंट? मुख्यमंत्र्यांकडं दोन खासदारांची महत्वाची मागणी; संतोष देशमुख प्रकरणात नेमकं काय सुरुए?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com