Walmik Karad : वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अपिलात हस्तक्षेपास खंडपीठाचा नकार

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्ती अपीलात हस्तक्षेपास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला असून आरोप निश्चित झाल्याने अपील निष्प्रभावीत ठरल्याचे नमूद केले.
Aurangabad Bench of the Bombay High Court declined to interfere in Valmik Karad’s discharge appeal in the Santosh Deshmukh murder case after charges were framed.
Aurangabad Bench of the Bombay High Court declined to interfere in Valmik Karad’s discharge appeal in the Santosh Deshmukh murder case after charges were framed.Sarkarnama
Published on
Updated on

High court News: वाल्मीक कराडच्या दोषमुक्तीच्या अपीलात हस्तक्षेपास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संदिपकुमार मोरे आणि न्या. आबासाहेब शिंदे यांनी नकार दिला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात कराडने दोषमुक्तीचे अपील दाखल केले होते.

कराडचा दोषमुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. म्हणून कराडने त्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यात शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान अंबाजोगाई येथील विशेष न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोप निश्चीत झाले.

त्यामुळे कराडने अपीलात अर्ज दाखल करुन दुरुस्तीची परवानगी मागीतली. शासनातर्फे कराडच्या दुरुस्तीच्या अर्जास विरोध करणारे शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या निकालांनुसार दोषारोप निश्चीत झाल्यानंतर दोषमुक्तीचा अर्ज निष्फळ ठरतो असे निदर्शनास आणून देण्यात आले.

Aurangabad Bench of the Bombay High Court declined to interfere in Valmik Karad’s discharge appeal in the Santosh Deshmukh murder case after charges were framed.
Ajit Pawar Plane Crash : अखेरच्या क्षणापर्यंत कामाचा ध्यास..., अजितदादांची एक्सवरील शेवटची पोस्ट चर्चेत

दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे कराडचा दोषमुक्तीचा अर्ज निष्फळ ठरतो. त्याचे अपीलही निष्प्रभावीत झाले असल्यामुळे ते फेटाळावे. दोषारोप निश्चीतीच्या मुद्दयातही दुरुस्ती करता येणार नाही, असे शासनाच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले.

Aurangabad Bench of the Bombay High Court declined to interfere in Valmik Karad’s discharge appeal in the Santosh Deshmukh murder case after charges were framed.
Walmik Karad : 'मकोका लावता येत नाही, देशमुखांच्या हत्येशी संबंध नाही...'; दोष मुक्तीसाठी वाल्मीक कराडचा खंडपीठात अर्ज

खंडपीठाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या वरील निकालांचा संदर्भ देत कराडचे (Walmik Karad) अपील निष्प्रभावीत झाल्यामुळे हस्तक्षेपास नकार देण्याचा मनोदय व्यक्त केला. शासनाच्यातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सचिन सलगरे आणि ॲड. पवन लखोटीया यांनी सहकार्य केले. कराडतर्फे ॲड. निलेष घाणेकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. संदेश कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com