Sambhajiraje Chhatrapati : "सर्व आरोपींचा आश्रयदाता..."; वाल्मिक कराड सरेंडर होताच संभाजीराजेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Sambhajiraje Chhatrapati On Walmik Karad : वाल्मिक कराड याच्या शरणागतीवरून संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद काढून घ्या आणि त्यांना बीडचं पालमंत्रीपद देऊ नये, अशी मागणी केली आहे.
Sambhaji Raje Chhatrapati, Dhananjay Munde, Walmik Karad
Sambhaji Raje Chhatrapati, Dhananjay Munde, Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Walmik Karad Surrender : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून केला जात आहे. तर देशमुख यांची हत्या झाल्यापासून वाल्मिक कराड फरार होता. अखेर त्याने मंगळवारी (ता. 31) पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्करली.

मात्र, कराड याच्या शरणागतीवरून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद काढून घ्या, शिवाय त्यांना बीडचं पालमंत्रीपद देऊ नये, अशी मागणी देखील केली आहे.

वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर झाल्यानंतर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले शिवाय केवळ खंडणीच्या गुन्हा दाखल न करता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात देखील तो दोषी असून या हत्या प्रकरणातील आरोपींचा म्होरक्या वाल्मिक कराडच असल्याच ते म्हणाले.

तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतरच लगेच कसा निर्णय घेतला असा प्रश्नही संभाजीराजेंनी उपस्थित केला. ते म्हणाले, "मुंडे काल मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर आज लगेच कसा निर्णय होतो. हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय वाल्मिक कराडने सरेंडर केलं म्हणजे विषय संपत नाही. त्याच्या नावावर 14 गुन्हे असतानाही तो बॉडीगार्ड घेऊन फिरतो.

Sambhaji Raje Chhatrapati, Dhananjay Munde, Walmik Karad
Beed Guardian Minister: गुन्हेगारी घटनांनी हादरलेल्या बीडबाबत मोठा निर्णय; भाजपच्या 'या' अनुभवी नेत्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी?

तसंच यावेळी त्यांनी तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही. सीएम फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना या प्रकरणातील सगळ्या आरोपींवर मोक्का लावणार असल्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली. दरम्यान, सात आरोपींवर मोक्का लागणारच आहे. पण कराड हा त्यां सर्वांचा म्होरक्या आहे. त्यामुळे त्याच्यावरही मोक्का लागला पाहिजे. खंडणीच्या गुन्ह्यात तो बेल घेऊन बाहेर पडू शकतो.

त्यामुळे विधानसभेत बोलल्याप्रमाणे गृहमंत्र्यांनी त्याच्यावर खूनाचा गुन्हा कसा लावणार ते सांगावं. धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल. त्यांना पालकमंत्रीपद मुळीच देऊ नये. शिवाय सध्या आहेत त्या मंत्रि‍पदावरून त्यांना खाली खेचल्याशिवाय बीडला आणि महाराष्ट्राला न्याय मिळणार नाही.

Sambhaji Raje Chhatrapati, Dhananjay Munde, Walmik Karad
Walmik Karad surrender news : खंडणीतील 50 लाख घेतले, दीड कोटीसाठी 'आका'नी माणसं पाठवली, अन्..; सुरेश धस यांच्या दाव्यानं खळबळ

असं म्हणतच वाल्मिक कराडवर मोक्का लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणावर एकदाही बोलले नाहीत. तुम्ही मुंडेला संरक्षण का देत आहात. बीड जिल्ह्यात सगळे लोक सांगतील की या म्होरक्याचा आश्रयदाता कोण आहे तर धनंजय मुंडे आहे, असं म्हणत संभाजीराजेंनी अजित पवरांना देखील निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com