Shivsena UBT Politics: शिवसेना ठाकरेंचे आंदोलन महापालिकेविरोधात, संताप झाला भाजपचा, काय आहे प्रकरण?

Kiran kulewar; Shivsena Thackeray party's agitation made unrest in BJP-भाजप नेते म्हणतात, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष हा तर ड्रामे बाज पक्ष आहे.
Ashok Dhatrak & Kiran Kulewar
Ashok Dhatrak & Kiran KulewarSarkarnama
Published on
Updated on

Dhule City Politics: धुळे महापालिका आणि शहरातील प्रश्नांवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाने केलेले ढोल बजाव आंदोलन भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजपने शिवसेना ठाकरे पक्षाला चांगलेच फटकारले आहे.

धुळे महापालिका तिजोरीत खडखडाट आहे. त्यात भर घालण्यासाठी सध्याच्या महापालिका आयुक्त अमिता दराडे पाटील यांनी शहरात घरपट्टी वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये थकबाकीदारांच्या घरापुढे महापालिका कर्मचारी बँड आणि ढोल वाजवून नागरिकांचे लक्ष वेधतात. त्याला प्रतिसाद देखील मिळत आहे. मार्च एंड पार्श्वभूमीवर महापालिकेची ही कारवाई सुरू आहे.

Ashok Dhatrak & Kiran Kulewar
Gulabrao Patil Politics: गुलाबराव पाटील म्हणतात, तो तर लाडक्या बहिणींचाच करंट...

या कारवाईमुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या मोहिमेमुळे धुळेकरांचे बेअब्रू होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्या विरोधात शिवसेनेने महापालिकेच्या आयुक्तांच्या घरासमोर निषेध आंदोलन केले. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवून ही कारवाई नियमानुसार करावी अशी मागणी केली होती.

Ashok Dhatrak & Kiran Kulewar
Devyani Pharande Politics: आमदार देवयानी फरांदे यांची धाड अन् पोलिसांची नाचक्की! पोलिसांना दिसले नाही ते फरांदेंनी शोधले

यावेळी शिवसेनेचे संपर्क नेते माजी आमदार अशोक धात्रक आणि शहराचे माजी आमदार शरद पाटील यांनी महापालिकेला शासनाचा ५०० कोटींचा निधी हवा आहे. त्या निधीतून कामे करताना भ्रष्टाचार करता यावा, म्हणून ही सगळी लगबग सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. शहरात कोणत्याही उपनलिका अथवा हातपंप न बसवतात ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी करण्यात आला.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे हे आंदोलन गेली अनेक वर्ष धुळ्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या चांगल्या जिव्हारी लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या किरण कुलेवार यांनी त्याला उत्तर दिले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे हे आंदोलन स्टाईल मारो आहे. हा पक्ष ड्रामेबाज आहे, या शब्दात त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांना हिनविले.

शिवसेना ठाकरे पक्षाला धुळे शहराच्या विकासाची खरोखर काळजी आहे का, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. यांना जर शहराचा विकास करायचा असता तर विधानसभेत धुळेकरांनी त्यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला नसता. त्यापासून धडा न घेता ते महापालिकेविरोधात अपप्रचार करीत असल्याचा दावाही गुलेवार यांनी केला.

शहरातील थकबाकी वसुली करणे हे महापालिकेचे काम आहे. महापालिका आयुक्त यांनी त्यासाठी मोहीम उघडली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाला आंदोलन करायचे असते, त्यांचा हेतू स्वच्छ असता तर त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले असते. महापालिका आयुक्तांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा उद्देश काय असा प्रश्न देखील गुलेवार यांनी केला.

__

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com