Daharashiv News : मुलीच्या जन्माचे स्वागत आता लक्ष्मीच्या पावलांनी; सरपंच, उपसरपंचांच्या मानधनातून अनोख्या योजना

Welcome The Birth of Women : वालवड ग्रामपंचायत देणार मुलीच्या जन्मानंतर 3000, तर लग्नाला 7000 रुपये मदत
Walwad Gram Panchayat
Walwad Gram Panchayat Sarkarnama
Published on
Updated on

शितल वाघमारे

Daharashiv News : ‘पहिली बेटी-धनाची पेटी' असे म्हणत मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याऐवजी मुलगी म्हणजे खर्चाला भार असा विचार करून तिचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. परक्याचे धन असा समज करून मुलीच्या जन्माचे स्वागत करावे आणि तिच्या रूपात साक्षात लक्ष्मी यावी, म्हणून भूम तालुक्यातील वालवड ग्रामपंचायतीने ‘सक्षम नारी उपक्रमांतर्गत जिजाऊंच्या जयंतीदिनी (ता. १२ जानेवारी) गावातील मुलीच्या जन्मानंतर व लग्नासाठी ‘लेक लाडकी माझ्या गावची’ व ‘कन्यारत्न’ योजनांची सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे मुलीचा जन्म लक्ष्मीच्या पावलांनी होणार आहे. (Walwad Gram Panchayat will welcome the birth of women)

विविध नावीन्यपूर्ण योजनांसाठी वालवड ग्रामपंचायत ओळखली जाते. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांचा सन्मान केला जातो. तसेच गावातील आंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना प्रत्येकवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून साड्या भेट दिल्या जातात. त्याचप्रमाणे आता गावात मुलीच्या जन्मानंतर स्री जन्माचे स्वागत करण्याच्या उद्देशाने ‘कन्यारत्न’ योजनेंतर्गत ३ हजार रुपये मिळणार आहेत. मुलीच्या लग्नाला मदत म्हणून ‘लेक लाडकी माझ्या गावची’ या योजनेंतर्गत ७ हजार रुपये देण्याचा निर्णय वालवड ग्रामपंचायतीने घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Walwad Gram Panchayat
Nashik MNS : नाशिकमध्ये मनसे प्रस्थापितांना दणका देणार; लोकसभेसाठी सूक्ष्म नियोजन..

या योजनांसाठी सरपंच-उपसरपंच आपले संपूर्ण मानधन देणार आहेत. तसेच, ग्रामपंचायतीच्या निधीतूनही तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही योजना १ जानेवारी २०२४ लागू करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या लाभासाठी मुलीचे आई-वडील गावचे रहिवासी असणे बंधनकारक असून मुलीचे लग्नासाठी वय १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. मुलीचा विवाह आई-वडिलांच्या मान्यतेने होणे आवश्यक आहे.

समाजात मुलगा-मुलगी असा भेदभाव होऊ नये. मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि मुलीच्या लग्नासाठी मदत व्हावी, या उद्देशाने या योजना ग्रामपंचायतीने सुरु केल्या आहेत, असे वालवडच्या सरपंच श्रीमती प्रभावती देवळकर यांनी सांगितले.

मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, त्यांच्या लग्नाला हातभार लागावा. महिला सबलीकरणाच्या उद्देशाने आमच्या मानधन व ग्रामपंचायत निधीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे उपसरपंच कृष्ण मोहिते यांनी स्पष्ट केले.

Walwad Gram Panchayat
Pandharpur News : शरद पवार गटाचा मोठा नेता अडचणीत; अभिजित पाटलांसह २१ संचालकांविरोधात राज्य बॅंकेची तक्रार

मुलीच्या जन्माचे स्वागत आणि लग्नासाठी मदत अनोख्या पद्धतीने ग्रामपंचायत करीत आहे. वास्तवातील महिला सबलीकरणाचे पाउल ग्रामपंचायतीने उचलले आहे. निश्चितपणे आगामी काळात हा उपक्रम इतरांना प्रेरणादायी ठरेल, असे गावचे ग्रामविकास अधिकारी एम. व्ही. गायकवाड यांनी नमूद केले.

Walwad Gram Panchayat
Loksabha election 2024 : दक्षिण मुंबईसाठी देवरांचा शिंदेसेनेशी घरोबा; पण भाजप जागा सोडणार का?

ग्रामपंचायतीचा उपक्रम कौतुकास्पद असून खऱ्या अर्थाने महिला सक्ष्मीकरणाचा कृतीशील निर्णय आम्हा सर्वांना खूप आवडला आहे, असे गावातील गृहिणी जयश्री वालवडकर यांनी म्हटले आहे.

Edited By : Vijay Dudhale

Walwad Gram Panchayat
Dharashiv-Solapur Railway : धाराशिव-सोलापूर लोहमार्ग भूसंपादनाचा वाद पेटला; राणाजगजितसिंह पाटील कोर्टात जाणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com