Nashik MNS : नाशिकमध्ये मनसे प्रस्थापितांना दणका देणार; लोकसभेसाठी सूक्ष्म नियोजन..

Loksabha Election : शेवटच्या मिनिटाला जरी पक्षप्रमुखांनी लढण्याचे आदेश दिले, तर आमची सर्व तयारी पूर्ण असेल.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज्यातील राजकारणाची पातळी प्रचंड खालावली आहे. यात शेतकरी, महिला, युवकांचे प्रश्न मागे पडले आहेत. मतदारांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे आम्ही लोकसभा मतदारसंघाचे सूक्ष्म नियोजन हाती घेतले आहे. मनसे या निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांना दणका देणारच, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी व्यक्त केला. (MNS prepares hard for Nashik Lok Sabha)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जनतेचे प्रेम आहे. आमच्या दौऱ्यांवेळी ते जाणवते. प्रभागनिहाय आढावा बैठका सातत्याने पार पडत आहेत. नागरिक स्वत: पुढे येत आहे. जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांचेही बूथनिहाय बैठका व नियुक्तींचे काम होत असून, या कामाचे प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीत दिसेल, असा विश्वास कोंबडे यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Milind Deora Resign Congres : आदित्य ठाकरेंची एकच सभा अन् देवरा काँग्रेसमधून आऊट; कुठे पडली ठिणगी?

मागील वेळी नाशिकमधून ४० नगरसेवक तर, राज्यात १३ आमदार निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत यापूर्वीचा पराभव फारच निसटता होता. पक्षप्रमुख राज ठाकरे सातत्याने नाशिकच्या घडामोडींकडे लक्ष ठेऊन असतात. लवकरच पक्षाचे संपर्क प्रमुख किशोर शिंदे आणि गणेश सातपुते यांच्या उपस्थितीत काही प्रवेश आणि पदाधिकारी नियुक्ती केल्या जातील. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. अगदीच बुथनिहाय मोबाईल क्रमाकांसह आमच्या फाईल्स तयार आहेत.

आता आमचे लक्ष पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाकडे आहे. पक्ष म्हणून आमची तयारी असली तरी ते आदेश देतील, तीच पूर्व दिशा असेल. शेवटच्या मिनिटाला जरी पक्षप्रमुखांनी लढण्याचे आदेश दिले, तर आमची सर्व तयारी पूर्ण असेल, असे कोंबडे यांनी स्पष्ट केले. ता. ९ मार्च हा पक्षाचा वर्धापनदिन असून, त्याचीही तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिराच्या निर्माण महोत्सवासाठीसुद्धा मनसैनिक तयार असल्याचे कोंबडे यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray
Pandharpur News : शरद पवार गटाचा मोठा नेता अडचणीत; अभिजित पाटलांसह २१ संचालकांविरोधात राज्य बॅंकेची तक्रार

सध्याची बिघडलेली राजकीय व्यवस्था आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मतदारांना सध्याच्या पक्षांवर विश्वास राहिलेला नाही. मतदारांमध्ये पोहोचून आमचे काम सुरू असल्याने मनसे यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना दणका देणारच, असा विश्वास कोंबडे यांनी व्यक्त केला.

Edited By : Vijay Dudhale

Raj Thackeray
Loksabha election 2024 : दक्षिण मुंबईसाठी देवरांचा शिंदेसेनेशी घरोबा; पण भाजप जागा सोडणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com