
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण राज्यभर गाजत असतानाच. या प्रकरणाच्या तपासाला आता चांगलीच गती आली आहे. खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर आता 'मोक्का' कारवाई करण्यात आली आहे. त्यातच वाल्मिक कराड राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत, अशा चर्चेंमुळे मुंडेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच त्यांच्या राजीनाम्यावरुन सरकारवरचा दबाव वाढत आहे.
वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता देशमुख हत्याप्रकरणी कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. याचदरम्यान राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे हे तातडीने परळीकडे रवाना झाले आहेत. संतोष देशमुख हत्येचा कट रचल्याचा आरोप करत वाल्मिक कराडच्या भोवतीचा फास आवळला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सुरुवातीपासूनच ज्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज (बुधवारी) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मोदी महायुतीतील आमदारांसोबत ते चर्चा करणार आहेत. त्यामुळे एवढा महत्वाचा कार्यक्रम सोडून मुंडे हे परळीला का गेले यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंडे परळीली जाण्यामागे काय कारणं असेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे हे परळीला जाण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकी कारण म्हणजे परळी आणि बीड (Beed) जिल्ह्यात तापलेले वातावरण शांत करण्याची गरज आहे.
वाल्मिक कराडवरील मकोका कारवाईनंतर आता परळीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. कराड समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. कराडची पत्नी, आई यांनी गेल्या 12 तासांपासून रात्री उशिरापर्यंत परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तर त्यांच्याबरोबर समर्थकही तेथून हटलेले नाहीत. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी वाल्मिक कराड याच्या चार समर्थकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
त्यामुळे अजित पवारांनी (Ajit Pawar) परिस्थिती हाताळायला मुंडेंना परळीत पाठवले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरं कारण म्हणजे देशमुख प्रकरणात मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी आणि मुंडे यांच्या भेटीमुळे नागरिकांमध्ये काही गैरसमज होऊ नये तसेच प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले आहे. असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.