Shivsena Politcal News : अंबादास दानवे हे फक्त कागदोपत्री नेते आहेत, तर चंद्रकांत खैरे यांना आता जिल्ह्यात कोणी ओळखत नाही. त्यांनी घरी बसून नातवंड सांभाळावीत, असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी लगावला. यापुढे जिल्ह्यात 'उबाठा'मध्ये फक्त खैरे- दानवे आणि तिकडे उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे हे बापलेकच शिल्लक राहतील, अशी टीकाही भुमरे यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच येत्या महिनाभर शहरात पाण्यासाठी आंदोलन करत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. 'लबाडांनो पाणी द्या' म्हणत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली असून त्याचे पडसाद आतापासूनच उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट तसेच खासदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) या जोडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकेचा भडीमार सुरू केला आहे.
संजय शिरसाट यांनी महापालिका निवडणुकीनंतर संभाजीनगर जिल्ह्यात उबाठाचे अस्तित्वच राहणार नाही, असा दावा केला आहे. तर आता संदिपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे या शिवसेनेच्या दोन नेत्यांवर तोंडसुख घेतले आहे. चंद्रकांत खैरे यांना आता जिल्ह्यात कोणीच ओळखत नाही, त्यांनी आता घरी बसून नातवंडे सांभाळावीत, असा सल्ला भुमरे यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर शहराला लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे, याचे श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार आहेत.
परंतु चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी या योजनेत लक्ष घातले असते तर आज ही योजना पूर्ण झाली असती. लोकांचे हाल झाले नसते, असेही भुमरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. तरी विरोधक त्यांच्या नावाने खडे फोडतात, चंद्रकांत खैरे हे ढोंगी असून त्यांनीच जिल्ह्यासाठी आणलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला. त्यांच्यामुळेच आज शहराला पाणी मिळत नाही, असा आरोपही भुमरे यांनी केला.
पैठण सुजलाम सुफलाम केले
पूर्वीचे खासदार वीस वर्षात कुठल्याही गावात फिरले नाही, पण मी मात्र मतदारसंघातील एकही गाव, वस्ती, वाड्या, तांडे सोडणार नाही, प्रत्येक गावापर्यंत पोचणार आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो, माझा मुलगा आमदार झाला. त्यामुळे पैठण मतदारसंघ सुजलाम सुफलाम झाला असून सगळीकडे पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या आहेत, असा दावा भुमरे यांनी केला.
अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांचे जिल्ह्यात अजिबात वजन नाही हे आम्ही विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले दानवे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही अंबादास दानवे हे कागदोपत्री नेते आहेत खैरे आणि दानवे या दोघांनी मिळूनच जिल्ह्याची वाट लावली त्यामुळे आता या पक्षात जिल्ह्यात दोघेच राहणार आणि वर ते बाभलेख पक्षात राहतील जिल्ह्यात चांगलं काम केलं असतं तर लोकांनी निवडून दिलं नसतं का असा असावा करत संदिपान भुमरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकेचा भडीमार केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.