Parbhani : राहूल पाटील नॉट रिचेबलच्या अफवेने खळबळ, पण ते मुंबईतच अन् रिचेबलही..

माझ्या बद्दल ज्यांनी कोणी अफवा पसरवली असेल, त्यांना माझी विनंती आहे की, एखाद्या लोकप्रतिनिधी विषयी असे चुकीचे संदेश देवून संभ्रम निर्माण करू नये. ( Mla Rahul Patil)
Shivsena Mla Rahul Patil, Parbhani
Shivsena Mla Rahul Patil, ParbhaniSarkarnama
Published on
Updated on

परभणी : शिवसेनेचे आमदार आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे अंत्यत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे डाॅ. राहूल पाटील हे नाॅटरिचेबल असल्याची अफवा काही वेळापुर्वी पसरली होती. (Parbhani) ते गुवाहाटीला बंडखोरांच्या ताफ्यात सहभागी झाल्याची चर्चा देखील रंगवली जात होती. परंतु पाटील यांनी लगेच खुलासा करत `मी नाॅटरिचेबल नाही, मुंबईतच आहे, कुठेही गेलेलो नाही` असे स्पष्ट केले आणि त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला.

परभणीचे आमदार राहूल पाटील (Rahul Patil) हे दोनवेळा शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडात मराठवाड्यातील १२ पैकी ८ आमदार सहभागी झाले, पण पाटील पक्षाशी आणि नेत्यांशी एकनिष्ठच राहिले. काल मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात झालेल्या मेळाव्यात देखील त्यांनी शिवसेना (Shivsena) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्यामुळेच आपण आज दोनदा आमदार होऊ शकल्याचे सांगतिले.

शेवटपर्यंत आपण शिवसेना आणि उद्धव साहेब, आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी राहूल पाटील यांच्याबद्दल अफवा पसरायला सुरूवात झाली. ते नाॅटरिचेबल असून गुवाहाटीला गेल्याचे देखील बोलले जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात व मुंबईत देखील खळबळ उडाली. परंतु हा कुणीतरी मुद्दाम केलेला खोडसाळपणा होता हे स्पष्ट झाले आहे.

Shivsena Mla Rahul Patil, Parbhani
Beed : संभाजीराजे छत्रपतींची चाढ्यावर मुठ अन् हातात चटणी भाकर..

आपल्याबद्दल अफवा पसरवल्या जात असल्याचे समजात राहूल पाटील यांनी स्वतः खुलासा केला. पाटील म्हणाले, मी कुठेही गेलेलो नाही. मी मुंबईतच आहे, मला कुठे जाण्याची गरज नाही. मी कालच युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजर होतो. त्या बैठकीस पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे हे देखील हजर होते. माझ्या बद्दल ज्यांनी कोणी अफवा पसरवली असेल, त्यांना माझी विनंती आहे की, एखाद्या लोकप्रतिनिधी विषयी असे चुकीचे संदेश देवून संभ्रम निर्माण करू नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com