Ahmednagar Politics : जोर्वे नाका घटनेकडे राजकीय हेतूने बघू नये; बाळासाहेब थोरातांचा रोख कुणाकडे?

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील जोर्वे नाका या ठिकाणी जमावाने युवकाला सशस्त्र मारहाण केली होती.
Balasaheb Thorat Resigned News
Balasaheb Thorat Resigned NewsSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil News : संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात युवकाला झालेल्या मारहाणीचे प्रकरण पुढे करत जातीय, धार्मिक वा सामाजिक रंग देत कुणीही राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करू नये. अशी भूमिका माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. ही भूमिका स्पष्ट करताना राजकीय हेतू ठेवू नये असे म्हणत थोरात यांनी अप्रत्येक्षपणे भाजप (BJP) नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील युवकाला शहरातील जोर्वे नाका या ठिकाणी रस्ता जॅम झाल्याने हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून जमावाने सशस्त्र मारहाण केली होती. यात आठ तरुण जखमी झाली होती. जोर्वे नाका परिसर मुस्लिम बहुल भाग आहे. या प्रकरणी शंभर ते दीडशे जणांच्या जमावावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच भांडणाला अनेकदा कारण ठरणारी जोर्वे नाका परिसरातील अनेक अतिक्रमणे मोठ्या पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेने तातडीने काढत रस्ता मोकळा केला होता.

Balasaheb Thorat Resigned News
Nashik News : 85 लाखांची रक्कम अन् तब्बल ३२ तोळे सोने! शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात सापडलेले घबाड बघून अधिकारी चक्रावले

जोर्वे नाका हल्ला प्रकरणाचे सामाजिक पडसाद सध्या दिसून येत असून दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये, घटनांचे सत्र दिसून येत आहे. त्याच बरोबर येत्या 6 जून रोजी संगमनेर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवा मोर्चाचे आयोजन शास्त्रीचौक ते प्रांत कार्यालय या दरम्यान करण्यात आले आहे. जोर्वे येथील युवकांना झालेली सशस्त्र मारहानही नंतर एका समाजाबद्दल चीड निर्माण झाल्याचे वातावरण असल्याने पोलिसांनी घटनेनंतर परिसरावर अधिक बंदोबस्त तैनात करत लक्ष ठेवलेले आहे.

या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी, आम्ही नेहमी विकासाचे व बंधुभावाचे राजकारण केले आहे. त्याला कोणी अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये, जोर्वे नाक्यावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. त्यामध्ये जे गुन्हेगार होते त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे असे, माझे स्पष्ट मत असल्याचे सांगत, प्रशासनही याची काळजी घेत आहे. मात्र, त्या घटनेला जातीय, धार्मिक किंवा सामाजिक रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. गुन्हेगाराला जात, धर्म नसतो. जो गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत, असे थोरात यांनी म्हंटले आहे.

Balasaheb Thorat Resigned News
Dhananjay Munde News : मी रात्रभर झोपलो नाही; कारण, गोपीनाथ मुंडेंचे फोटो... : धनंजय मुंडेंकडून आठवणींना उजाळा

संगमनेरमध्ये असलेले विकासाचे आणि बंधूभावाचे वातावरण कौतुकास्पद आहे, आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात. मात्र, हे चांगले वातावरण बिघडवून, संगमनेरला अस्थिर करण्याचा प्रयत्नही सुरू आहे, हे नाकारता येणार नाही, असेही थोरात म्हणाले. जोर्वे नाक्यावर घडलेल्या घटनेकडे संधी म्हणून बघितले जात आहे. मात्र, यामागे दडलेला त्यांचा राजकीय हेतू आपणासही ठाऊक आहे असे सांगत नाव न घेता थोरात यांनी टीका केली. त्यांचा रोख हा विखे पाटलांकडे असल्याचे बोलेल जात आहे.

एखाद्या घटनेला धार्मिक किंवा सामाजिक रंग देऊन संगमनेरची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवू देऊ नका, आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहन या निमित्ताने थोरात यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com