Ambadas Danve On CM Fadnavis Speech : गुन्हेगार पोसणारे मंत्री कॅबिनेटमध्ये ठेवले तर नवे बीड कसे करणार!

Exploring the challenges and contradictions of creating new beed when ministers support criminals : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आत्ताच आष्टी तालुक्यात भाषण झाले. एकूण भाषण पाहता, मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आता मोडीत निघाली असंच दिसतंय. कारण या योजनेच्या नावाचा साधा उल्लेखही आज भाषणात नव्हता.
Devendra Fadnavis, Ambadas Danve
Devendra Fadnavis, Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : आष्टी मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवे बीड तयार करण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आपल्या भाषणातून केले. खून, खंडणी आणि त्यात राजकीय नेत्यांचा समोर येणारा संबंध यावरून गेल्या दोन महिन्यापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चिला जात आहे.

बीडची बदनामी केली जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर नवे बीड तयार करायचे आहे, अशी साद मुख्यमंत्र्यांनी घातली. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे. गुन्हेगारांना पोसणारे कॅबिनेटमध्ये ठेवले तर नवे बीड कसे तयार होणार? असा सवाल दानवे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मीक कराड व इतर आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप व त्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadnavis) नवे बीड तयार करण्याच्या आवाहनावर टीका केली.

Devendra Fadnavis, Ambadas Danve
Pankaja Munde News : देवेंद्र फडणवीस बाहुबली तर मी शिवगामी! 'मेरा वचन ही मेरा शासन' आष्टीच्या कार्यक्रमात रंगला कलगितुरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आत्ताच आष्टी तालुक्यात भाषण झाले. एकूण भाषण पाहता, मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आता मोडीत निघाली असंच दिसतंय. कारण या योजनेच्या नावाचा साधा उल्लेखही आज भाषणात नव्हता. उलट 'नदी जोड'चे नवीन भूत बाटलीतून आज बाहेर आलेले दिसले. ही योजना केंद्राकडे मंजूरीला गेल्यावर केंद्राचे किमान 2 अर्थसंकल्प झाले आहेत. मात्र या योजनेला एक दमडाही घोषित झालेला नाही.

Devendra Fadnavis, Ambadas Danve
Suresh Dhas : CM फडणवीस अन् पंकजांसमोर आमदार धस पुन्हा कडाडले; म्हणाले, 'ठराविक राजकारण्यांचा गुन्हेगारीला...'

दुसरीकडे, एक नवे बीड बनवण्यासाठी लोकांनी काम करावं असं मुख्यमंत्री बोलले. पण नवीन बीड करायचे असेल तर रोज नव नवीन भ्रष्टाचाराचे आरोप होणारे आणि आतापर्यंत गुन्हेगारी पोसणारे लोक मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये ठेवले तर बीडची गुन्हेगारांपासून मुक्ती होणे नाही, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis, Ambadas Danve
CM Devendra Fadnavis : 'कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होणारचं' ; फडणवीस यांचा बीडमधून इशारा

भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात झालेल्या सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते. यावेळी धस, पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. अंबादास दानवे यांनी मात्र नवे बीड करण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची संधी हेरलीच.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com