
Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता दोन महिने होत आहे. तर या प्रकरणावरून राज्यातील वातावरण आता चांगलेच तापलं असून आरोपींना फाशी देण्याची मागणी केली जातेय. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी लावून धरण्यात आली आहे. ही मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली होती. तर त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना देखील यावरून निशान्यावर घेतले होते. पण आता देशमुख प्रकरणात आवाज उठवणारे सर्व नेते, पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर बीडमध्ये आले होते. यावेळी फडणवीस देशमुख हत्येप्रकरणी कोणती घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका विरोधक करत असतानाच फडणवीस यांनी, देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. तर या प्रकरणात कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल हा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे आता या प्रकरणात आता आणखी कोणाकोणावर कारवाई केली जाणार याकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे.
बीडमधील आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी आणि बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून देशमुखांची हत्या करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
तसेच या प्रकारच्या घटना आता बीडच काय तर राज्यात देखील कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत असाच इशारा त्यांनी दिला आहे. तसेच यावेळी फडणवीस यांनी बीडकरांना विनंती केली ही केली आहे. फडणवीस यांनी, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींनी एकत्र करुन स्वराज्याचा स्थापना केली. आपल्यालाही अशाच प्रकारे सर्वांना एकत्र नांदायचे आहे आणि एक नवीन बीड निर्माण करायचा आहे.
ज्यापद्धतीने सुरेश धस किंवा पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याचा इतिहास सांगितला तसाच जिल्हा पुन्हा उभा करायचा आहे. जो गौरवशाली असेल. या प्रयत्नात तुम्ही सर्व सहभागी असाल आणि मी देखील ठामपणे तुमच्या मागे उभा राहिन, असे फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी, मराठवाड्यात कृष्णा खोऱ्याचे पाणी आणलेच जाईल. यासाठी गोपिनाथ मुंडे यांनी त्यांच्या काळात 23 टीएमसी पाण्याचा निर्णय झाला. पण प्रत्यक्षात 7 पाणी सापडतं होतं. यामुळे नव्याने यावर निर्णय घेत नदी जोड प्रकल्पातून 53 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणलं जाणार आहे.
यामुळे बीड जिल्ह्यातील दुष्काळ हा आता भूतकाळ होणार असून पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी याआधी आपलं सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पाईप पद्धतीने आणतं होतं पण आता शेतकर्यांच्या शेतापर्यंत पाणी ड्रीपने आणण्याची सरकारची योजना असल्याचे फडणवीस म्हणाले.
2014-15 ला दुष्काळ मराठाड्यासह महाराष्ट्रात पडला. त्यानंतर जलयुक्त शिवार योजना आणली. ज्यामुळे राज्यात भूजल पातळी वाढली. आता मराठवाड्यात जलसंधारणासह पश्चिमी वाहिण्यांचे पाणी आणण्याची योजना आखली आहे. ज्यात चार नदी जोड प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांना विनंती करून चार नदी जोड प्रकल्पांना मान्यता देण्याची मागणी केली होती. ती त्यांनी मान्य केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
तर शेतकऱ्यांना आता मोफत वीज देण्यात येत असून भविष्यात दिवसा वीज देण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवण्यात येत असून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.