High Court News : विद्यादीप बालगृहातील मुलींचे स्थलांतर कधी करणार ? शपथपत्र सादर करण्याचे आदेश!

High Court bench questioned the authorities about the delay in transferring girls from Vidyadeep orphanage : मुलींनी पलायन केल्यानंतर या प्रकरणी नऊ जुलै 2025 रोजी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींना अटक झालेली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
Bombay High Court bench Aurangabad News
Bombay High Court bench Aurangabad NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : विद्यादीप बालगृहातील मुलींनी पलायन केल्याच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून दखल घेतलेली आहे. या प्रकरणात विद्यादीप बालगृहाचा परवाना संपल्यानंतर सदरील मुलींचे कायद्यानुसार इतर बालगृहात स्थलांतर केव्हा करणार? याची शपथपत्रासह माहिती सादर करावी, असे आदेश न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी दिले आहेत.

बालगृहाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad High Court) स्वतःहून याचिका दाखल करून घेतल्यानंतर न्यायालयाचे मित्र म्हणून वरिष्ठ विधिज्ञ प्रशांत कातनेश्वरकर यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी सदर याचिका तयार करून उच्च न्यायालयात सादर केली आहे. याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयातील बचपन बचाव आंदोलन याचिकेच्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला.

राज्य सरकारतर्फे बालगृहातील मुलींनी पलायन केल्यानंतर या प्रकरणी नऊ जुलै 2025 रोजी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. (Chhatrapati Sambhajinagar) या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींना अटक झालेली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. तसेच महिला व बालकल्याण विभागने विद्यादीप बालगृहातील मुलींचे दुसऱ्या बालगृहात स्थलांतराबाबत निर्देश दिलेले आहेत. बचपन बचाव आंदोलन याचिकेमधील उच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांबाबात राज्य सरकारने काय पावले उचलली? अशी विचारणाही न्यायालयाने केली.

Bombay High Court bench Aurangabad News
High Court News : विद्यादीप बालगृहातील मुली पळून गेल्याच्या प्रकरणात काय कारवाई केली ? खंडपीठाचा सवाल

सदर प्रकरण केवळ विद्यादीप बालगृहापर्यंत मर्यादित न ठेवता सदर घटनेच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच बालगृहा संदर्भात शासनास हे निर्देश आहेत. बचपन बचाओ आंदोलन याचिकेच्या निर्देशांचा अनुपालन अहवाल शपथपत्रासह सादर करावा. बालकल्याण समितीने 2023 मध्ये विद्यादीप बालगृहातील मुलींच्या छळाबाबत कारवाईचे पत्र छावणी पोलिस ठाण्यात दिलेले होते.

Bombay High Court bench Aurangabad News
High Court News : पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम वेळेत पूर्ण केले नाही ; अभियंत्यांना खंडपीठाची नोटीस..

त्याबाबत काय पावले उचलली त्याचीही माहिती सादर करावी. तसेच सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने बाल संरक्षण कायद्यानुसार तपासाची कारवाई करावी असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या संदर्भातील शपथपत्र एका आठवड्यात सादर करावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी 25 जून रोजी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com