Mahayuti Big Update : मोठी बातमी! CM शिंदे अन् DCM अजित पवारांचा महत्त्वपूर्ण दिल्ली दौरा तडकाफडकी रद्द; काय आहे कारण?

Eknath Shinde And DCM Ajit Pawar News : या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक होणार होती.
Ajit Pawar, Amit Shah, Eknath Shinde
Ajit Pawar, Amit Shah, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राला सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी तसेच सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाची धडपड सुरू आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आप आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

यातच सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे शीर्षस्थ नेते अनेकवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ,उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते दिल्लीला जाणार होते. पण आता त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.

या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar),उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक होणार होती.या बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार होते.शिंदे आणि अजितदादांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या.

पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा (ता.16) दिल्ली दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.आता उद्या दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे.

Ajit Pawar, Amit Shah, Eknath Shinde
S Jaishankar on Pakistan : एस जयशंकर यांनी शहबाज शरीफ यांच्यासमोरच पाकिस्तानला सुनावलं, म्हणाले...

उद्या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी असल्याने दोन्ही नेते तिथेच अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.उद्या चंदिगढ येथे अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचा दावा प्रमुख नेत्यांकडून केला जात आहे. ज्या काही ठराविक जागांवरुन पेच निर्माण झाला आहे, त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बुधवारी(ता.16) रात्री उशिरा ही बैठक होणार होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महायुतीच्या जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकीत शाह यांनी मोठं विधान केलं होतं. यावेळी शाहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री पदासाठी आमच्या नेत्यांनी त्याग केला, आता तुम्ही त्याग करा,असे सूचक विधान केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्या वृत्ताला दुजोरा दिल्यामुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली.

Ajit Pawar, Amit Shah, Eknath Shinde
Vasant Gite Politics: नाशिक मध्य मतदारसंघात बोगस मतदार, वाद पोहोचला उच्च न्यायालयात!

महायुतीच्या पत्रकार परिषदेत मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात खुलासा करत ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र,तरीही शिवसेनेच्या आमदारांनी अमित शाहांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त करत भाजपच्या जिव्हारी लागेल अशा प्रतिक्रिया खासगीत उमटताना दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com