Mahadev Jankar Statement: गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार कोण? जानकरांनी धनंजय मुंडेंच्या नावावर मारली फुली; 'ही' चार नावं सांगितली

Gopinath Munde Political Controversy : माजी मंत्री आणि रासपचे नेते महादेव जानकर यांनी सोमवारी (ता.27) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार कोण यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय वादावर रोखठोक विधान केलं आहे. त्यांनी स्वत:सह मुंडेंच्या राजकीय वारसदारांची यादीच वाचून दाखवली.
Gopinath Munde-Mahadev Jankar
Gopinath Munde-Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News: मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून एकेकाळी धनंजय मुंडे यांच्याकडं पाहिलं जात असं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. गेले काही दिवस याच मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच आता पंकजा मुंडे यांना बहीण मानणारे आणि गोपीनाथ गडावरील दसरा मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहणार्‍या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असलेल्या महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) आता मुंडेंच्या राजकीय वारसदार वादात उडी घेतली आहे.

माजी मंत्री आणि रासपचे नेते महादेव जानकर यांनी सोमवारी(ता.27)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार कोण यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय वादावर रोखठोक विधान केलं आहे. त्यांनी स्वत:सह मुंडेंच्या राजकीय वारसदारांची यादीच वाचून दाखवली.

महादेव जानकर यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा एक नंबर वारसदार पंकजा मुंडे,दोन नंबर प्रीतम मुंडे आणि तीन नंबरला यशश्री आणि चार नंबरला महादेव जानकर हेच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार असल्याचं ठणकावलं आहे.या यादीत त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव राजकीय वारसदारांच्या यादीतून वगळलं आहे.एकीकडे धनंजय मुंडेंचं नाव वगळतानाचं दुसरीकडे जानकरांनी मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचं नाव जोडल्यानं मराठवाड्यासह महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

महादेव जानकर यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार शा‍ब्दिक हल्ला चढवला आहे.ते म्हणाले, राज्यातलं हे सरकार भांबावलेले असून सरकारचा स्वतःवर कंट्रोल राहिलेला नाही. सरकारने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावला असून मानवतावादी व्यवस्था या देशात निर्माण झाली पाहिजे. परंतु, सत्ताधारी हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा अशी भांडणं लावत आहे असा घणाघातही जानकर यांनी केला.

Gopinath Munde-Mahadev Jankar
Harshvardhan Patil News: इंदापूरमध्ये राजकीय भूकंप? हर्षवर्धन पाटलांना होमग्राऊंडवरच मोठा धक्का; भरणेंनी तीन जवळचे नेते फोडले

आम्ही सत्तेत आहे म्हणजे आपण फार मोठे आहोत असं या सरकारला वाटत आहे. परंतु,राज्यात तसं वातावरण नसल्याचा दावाही महादेव जानकर यांनी केला आहे.महिला,कॉन्ट्रॅक्टर,शेतकरी यांसह सगळेच या महायुती सरकारवर नाराज असल्याचं चित्र सध्या आहे.आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात एवढेच अजितदादा आणि एकनाथ शिंदेंनी लक्षात ठेवावं असा सल्लाही जानकर यांनी भाजपच्या मित्रपक्षांना दिला.

जानकर म्हणाले,महाराष्ट्रातील 33 जिल्हे फिरलो,पण राज्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याचमुळे मी शेतकऱ्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करतोय. परंतु, नाही जमलं तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वतंत्र लढू असे संकेतही महादेव जानकर यांनी दिले आहेत.

Gopinath Munde-Mahadev Jankar
Pankaja Munde : वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा, तो विकला नाही तर वाचवला! पंकजा मुंडेंकडून स्पष्टीकरण

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार धनंजय मुंडेच आहेत, असं विधान करत मुंडे बहीण भावांमध्ये हे विधान करून संघर्षाची ठिणगी टाकल्याचा आरोप आता केला जातोय. या वादामध्ये करुणा मुंडे यांनी उडी घेत गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत, असे म्हणत भुजबळांच्या सुरात सूर मिसळला आणि हा वाद अधिकच चिघळला.

आता या संपूर्ण वादात पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन हे भाचीच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. करुणा मुंडे कोण? त्या जर स्वतःला धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणत असतील तर आपल्या पतीची अब्रू चव्हाट्यावर आणणे त्यांनी बंद करावे, एवढे केले तरी पुरेसे आहे. गोपीनाथ मुंडे यांचा वारस ठरवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील इतर वरिष्ठ सदस्य आहेत.त्यात करुणा मुंडे यांनी बोलण्याची गरज नाही, अशा शब्दात सुनावले.

Gopinath Munde-Mahadev Jankar
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या टार्गेटवर आता विशाल पाटील; ‘तुमचा जातीयवादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचावाच लागेल’

केवळ मुंडे नाव आहे म्हणून काहीही बोलायचे असे चालणार नाही. हे नाव त्यांच्या मागे नसते तर राजकीय वारसा वरून केलेल्या विधानानंतर त्यांच्या घरावर दगडं पडली असती, असा इशारा देत प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक आणि राजकीय वारस असल्याचे ठणकावून सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्या मालमत्तेच्या वारसही पंकजा मुंडे आणि माझी बहीण याच आहेत. याशिवाय दुसरा कुठला वारस असतो का? असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com