Harshvardhan Patil News: इंदापूरमध्ये राजकीय भूकंप? हर्षवर्धन पाटलांना होमग्राऊंडवरच मोठा धक्का; भरणेंनी तीन जवळचे नेते फोडले

Indapur Politics: एकीकडे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इंदापुरात स्वत:ची ताकद वाढवताना अनेक महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश होत असताना दुसरीकडे तीन जवळच्या नेत्यांनी एकाचवेळी साथ सोडल्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या राजकारणाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Dattatray Bharne, Harshvardhan Patil
Dattatray Bharne, Harshvardhan Patil Sarkarnama
Published on
Updated on

Indapur News: एकेकाळी इंदापूरच्या राजकारणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा मोठा दबदबा होता. मात्र, त्यांना विधानसभेच्या 2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. गेल्या वर्षी विधानसभेला झालेल्या पराभवानंतर पाटील बरेच बॅकफूटला गेले.ते पुन्हा एकदा शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या वाटेवर असल्याचीही जोरदार चर्चाही रंगली होती. याचदरम्यान, हर्षवर्धन पाटलांना (Harshvardhan Patil) त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हर्षवर्धन पाटील सध्या आहेत.मात्र,त्यांच्याकडे कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.तसेच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगेसच्या मेळावे, बैठका आणि विविध संघटनात्मक कार्यक्रमांना हजेरी लावत असले तरी,ते इंदापूरच्या राजकारणात फारसे सक्रीय नसल्याचीही चर्चा आहे.अशातच इंदापूरच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कट्टर समर्थक तीन बड्या नेत्यांनी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंच्या गोटात दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. पाटील यांचे तीन अत्यंत विश्वासू समजले जाणारे इंदापूरचे (Indapur) माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे,मोटार वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ राऊत आणि माजी नगरसेवक गोरख शिंदे या तीनही नेत्यांनी आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत अशोक इजगुडे, रघुनाथ राऊत आणि गोरख शिंदे यांचा येत्या दोन दिवसांत मुंबईत पक्षप्रवेश पार पडणार आहे. या तीनही नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होत असलेला पक्षप्रवेश हा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशानंतर इंदापूर तालुक्याचं राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Dattatray Bharne, Harshvardhan Patil
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या टार्गेटवर आता विशाल पाटील; ‘तुमचा जातीयवादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचावाच लागेल’

भाजपनं इंदापुरात पाटलांचा पर्याय शोधला...?

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि इंदापूरच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ म्हणून ओळख असलेल्या प्रवीण माने यांनी कमळ हाती घेतल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लागला आहे.तसेच माने यांच्या रुपानं भाजपनं इंदापुरात पाटील यांना पर्याय शोधल्याचं बोललं जात आहे. याचवेळी भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दत्तात्रय भरणेंना बालेकिल्ल्यातच तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रवीण माने हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.पण विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीपासून ते पवारांपासून दुरावले होते.मात्र,आता माने यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची इंदापुरात चांगलीच ताकद वाढली आहे.

Dattatray Bharne, Harshvardhan Patil
Rahul Gandhi : राहुल गांधींमुळे निवडणूक आयोग वठणीवर; हर्षवर्धन सपकाळांचा दावा

जिल्हा परिषदेचे माजी सभापती दशरथ माने यांचे चिरंजीव पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती.इंदापूरच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिकेत असणाऱ्या मानेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानं तालुक्यात भाजपला मुरब्बी चेहरा मिळाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माने यांच्यामुळे भाजपची इंदापुरात निश्चितच ताकद वाढली आहे.

एकीकडे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इंदापुरात स्वत:ची ताकद वाढवताना अनेक महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश होत असताना दुसरीकडे तीन जवळच्या नेत्यांनी एकाचवेळी साथ सोडल्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या राजकारणाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर इंदापुरच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता असून हर्षवर्धन पाटील यांचा चागलाच कस लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com