Dhananjay Munde News : परळीचा उमेदवार कोण ? माहित नाही ; पण तो महायुतीचा असेल..

Marathwada : महायुतीचा उमेदवार तीन पक्षांचे नेते ठरवतील असे सांगत गुगली टाकली.
Dhananjay Munde, Pankaja Munde News
Dhananjay Munde, Pankaja Munde NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra : अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक मतदारसंघातील समीकरणांवर चर्चा झडू लागली. (Dhananjay Munde News) त्यात प्रामुख्याने राजकारणात एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनंजय आणि पंकजा मुंडे या बहिण भावांच्या परळीची. या संदर्भात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला असता त्यांनी तो खूबीने टोलवला.

Dhananjay Munde, Pankaja Munde News
Latur District News : विकासाचा एवढाच पुळका असेल तर कासारसिरशी तालुका करा

परळीचा उमेदवार कोण असेल? हे आता राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे नेते ठरवतील. त्यामुळे तो कोण असेल ? या पेक्षा तो महायुतीचा असेल हे महत्वाचे आहे. (Dhananjay Munde) महायुतीचाच आमदार परळीमधून निवडून येईल, हे मात्र मी निश्चितपणे सांगू शकतो, असे मुंडे यांनी सांगितले. (NCP) धनंजय मुंडे सरकारमध्ये मंत्री झाल्यापासून त्यांच्या आणि पंकजांच्या समर्थकांच्या मनामध्ये आता पुढे काय? असा प्रश्न घोळत आहे.

धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आणि आता मंत्री असल्यामुळे सहाजिकच तेच उमेदवार असतील हे माहित असल्यामुळे त्यांचे समर्थक निश्चिंत आहेत. पण मग (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांचे काय? विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असेल? यावर चर्चा सुरू झाली आहे. मुंडे यांनी मात्र विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असेल? हे माहित नाही, महायुतीचा उमेदवार तीन पक्षांचे नेते ठरवतील असे सांगत गुगली टाकली. त्यामुळे या प्रश्नासंदर्भातील संभ्रम अजूनच वाढला आहे.

पकंजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द संकटात आहे का ? ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांच्यासोबतच तुम्ही गेलात? या प्रश्नांवर देखील मुंडे यांनी उत्तर दिले. राजकारणात बॅड पॅच येत असतात. माझ्या आयुष्यात देखील ते आले होते. प्रत्येकाला या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. पकंजा यांचा सध्या बॅड पॅच सुरू असला तरी त्यांचे राजकारण कुणी संपवू पाहत आहे, असे मला अजिबात वाटत नाही.

त्यांनी देखील असे सांगण्याचा प्रयत्न करू नये. राजकारणात हे कळाले तो यशस्वी होतो. माझ्या आयुष्यात आले तेवढे वाईट प्रसंग किंवा अनुभव पंकजा यांच्या आयुष्यात आले नाहीत. त्यामुळे वाईट काळात उलट मला कुणीही संपवू शकत नाही, असा आत्मविश्वास घेऊन वाटचाल केली पाहिजे, असा सल्ला देखील मुंडे यांनी पकंजा यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.