Dasara Melava 2023 News : शिंदेंचे सगळे मंत्री व्यासपीठावर, मग सत्तारच खाली का ?

Abdul Sattar News : आपले महत्त्व पटवून देण्यासाठी सत्तारांनी खेळी केली आणि तिने परिणाम साधलाच.
Dasara Melava Rally News
Dasara Melava Rally News Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : मुंबईच्या आझाद मैदानावर काल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात एक गोष्ट घडली. ती म्हणजे शिंदेंचे सगळे मंत्री व्यासपीठावर बसलेले असताना राज्याचे पणन व अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार मात्र तिथे नव्हते. (Dasara Melava 2023 News) मेळाव्याला गर्दी जमवण्याची मोठी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर सोपवली होती. परंतु मराठा समाज आरक्षणाचा निर्णय न झाल्यामुळे नाराज असल्याचा फटका अब्दुल सत्तार यांना बसला. दोनशे बस तैनात केल्या पण लोक येत नसल्यामुळे ६० बस रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

Dasara Melava Rally News
Maratha Reservation News : `मोदी गो बॅक`, सकल मराठा समाजाचा शिर्डीतील सभेवर बहिष्कार...

१४० बसमधूनही जेमतेम लोक गेले. त्यामुळे २५ हजार लोक मतदारसंघातून आणण्याचा दावा करणारे सत्तारभाई तोंडघशी पडले. पण त्याचा आणि (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांचा व्यासपीठावर न बसण्याचा संबंध जोडणे जरा धाडसाचे ठरेल. अब्दुल सत्तार यांचे राजकारण जे जवळून ओळखतात, त्यांना सत्तार शिंदे (Eknath Shinde) यांची सभा ऐकण्यासाठी प्रेक्षकांमध्ये किंवा मतदारसंघातील लोकांसोबत बसतील हे पटणारच नाही.

काॅंग्रेस, शिवसेना (Shivsena) व आता शिंदे गट असा राजकीय प्रवास केलेले अब्दुल सत्तार हे आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी कायमचा करार नसतो, तो प्रासंगिक असतो असे जाहीरपणे सांगतात. शिंदेंच्या उठावात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर त्यांना शिंदेंनी थेट राज्याचे कृषिमंत्री पद बहाल केले. पण आपल्या अतिउत्साही आणि माध्यमांशी नको ते बोलण्याच्या छंदामुळे त्यांची अनेकदा पंचाईत झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कृषिमंत्री असताना त्यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे त्यांचे पद धोक्यात आले होते. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांभाळून घेतले. (Shivsena) पण जेव्हा विषय दिल्लीच्या हायकमांडपर्यंत गेला, तेव्हा मात्र मुख्यमंत्र्यांचाही नाईलाज झाला आणि त्यांना `चट्टाण` (अमित शाह) पुढे झुकावे लागले. सत्तारांचे कृषिमंत्री पद काढून घेऊन त्यांना अल्पसंख्याक खात्याचा कारभार सोपवण्यात आला. महत्त्वाचे खाते जाऊन दुय्यम मंत्रालयाचा पदभार मिळाल्यामुळे साहजिकच सत्तार नाराज होते.

पण ही नाराजी त्यांनी जाहीर न करता जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले. पण सत्तारांचे हे नरमाईचे धोरण म्हणजे त्यांच्या पुढच्या राजकीय खेळीचे पहिले पाऊल समजले जाते. दसरा मेळाव्याला गर्दी जमवून मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचे प्रयत्न मराठा समाजाच्या नाराजीने फोल ठरले. पण अशावेळीही आपले महत्त्व पटवून देण्यासाठी सत्तारांनी खेळी केली आणि तिने परिणाम साधलाच. लाखोंच्या गर्दीसमोर व्यासपीठावर बसण्याची संधी सोडून सत्तारांनी मतदारसंघातून आलेल्या लोकांमध्ये बसण्याचा निर्णय घेतला.

साहजिकच स्टेजवर सत्तारांची अनुपस्थिती मुख्यमंत्र्यांना जाणवली. या अनुपस्थितीची माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा होऊ नये, याची काळजी घेत मुख्यमंत्र्यांनी याचाही मोठ्या खुबीने वापर केला. अब्दुल सत्तार कुठे आहेत? समोर बसले आहेत का? अशी जाहीर विचारणा केली आणि मग सत्तारांनीही जागेवर उभे राहून दोन्ही मुठी आवळत शिंदेंना मी इथे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

झालं शिंदेंनी मग आमचे मंत्री समोर लोकांमध्ये बसून भाषण ऐकत आहेत, मीही असाच बाळासाहेब ठाकरेंची सभा समोर बसून ऐकायचो, असे सांगत सत्तारांचे कौतुक केले. आता हे सत्तारांचे कौतुक होते? की त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत लाखो लोकांसमोर सत्तारांचा उल्लेख केल्याने पाहिजे तो परिणाम त्यांनी साधलाच, असे म्हणावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare

Dasara Melava Rally News
Maratha Reservation News : फोनची रिंग वाजताच राजकीय नेत्यांना भरते धडकी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com