Anjali Damania On CM Fadnavis : धनंजय मुंडेंनी मागितली अन् मुख्यमंत्र्यांनी एसआयटी जाहीर केली! इतकी मित्रता का?

Maharashtra CM's quick response to Dhananjay Munde's demand sparks controversy. SIT formed within a day. : जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात?
Anjali Damania, Devendra Fadnavis News
Anjali Damania, Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : बीड येथील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर संस्थाचालक आणि शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नुकचात उघडकीस आला. या संतप्त घटनेचे पडसाद विधीमंडळात उमटत असतानाच आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. त्यानंतर चोवीस तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात एसआयटी चौकशीची घोषणाही केली.

परंतु मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेवरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी प्रश्न उपस्थितीत केला आहे. धनंजय मुंडे यांनी मागितली आणि मुख्यमंत्र्यांनी एसआयटी जाहीर केली, इतकी मित्रता का? असा टोला लगावला आहे. मुळात जो व्यक्ती महिलांवर स्वतः अत्याचार करतो, ज्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत त्याने बीडच्या अल्पवयीन मुलीवर भाष्य करावं, याचाच राग येतो. त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एसआयटी लावता? या बद्दल आश्चर्य व्यक्त करत अंजली दमानिया यांनी टोला लगावला.

बीड मधील अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी समाजात अनेक चांगली लोकं आहेत. आम्ही तिला न्याय मिळवून देऊ, असेही दमानिया यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. आज दुपारी २ वाजता मी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांची भेट, विधान भवनात येऊन घेणार आहे. काल धनंजय मुंडेंना (Dhananjay Munded) बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाश्य करताना बघून खूप राग आला.

Anjali Damania, Devendra Fadnavis News
Anjali Damania : अंजली दमानियांचा पंकजा मुंडेंवर तिखट प्रहार; म्हणाल्या, ‘ज्या आपल्या भावाला बदलू...’

जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात? बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणस आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही, अशा शब्दात दमानिया यांनी फटकारले.

Anjali Damania, Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis In Assembly Session : बीड लैगिंक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी! मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

वैष्णवीच्या केसमध्ये मी तिच्या आईवडीलांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा एक महिन्याने केस फास्ट ट्रॅकवर वर केली. ही केस मुख्यमंत्र्यांनी तेव्हा तत्काळ फ़ास्ट ट्रॅकवर का केली नाही? सगळ्या महिला आमदारांनी ह्याचा विरोध करायला हवा. महिलांच्या सगळ्या प्रश्नांची दखल ही तत्काळ घेतली गेली पाहिजे, पण ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा हक्क नाही, असेही दमानिया म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com