
Mumbai, 03 June : पंकजा मुंडे बीडमधील काही गोष्टी सुधारू शकत नाहीत. बीडमधील त्यांच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती बदलू शकत नाहीत. त्यांच्या भावाला बदलू शकत नाहीत, त्या मोठ्या जगाला बदलायला निघाल्या आहेत, अशी उपरोधिक टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.
वनवास हा पांडवांना झाला. तो कौरवांना किंवा रावणाला झाला नाही. याचा नेमका कार्य अर्थ काढावा. धनंजय देशमुख यांच्या खुनानंतर महाराष्ट्रात जे काही राजकारण झाले, त्याला अनुसरून हे विधान आहे का, असा सवाल अंजली दमानिया (Anjali Damania) यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी दमानिया यांनी पंकजा मुंडेंंवर उपरोधिक टीका केली आहे.
त्या म्हणाल्या, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीडमधील समस्या दिसत नाहीत. ऊसतोड महिलांचे प्रश्न त्यांना दिसत नाहीत. ऊसतोड महिलांच्या आरोग्यासंदर्भात एक ठोस भूमिका घेऊन त्यांनी सरकारकडे निवेदन करायला हवे होते. पण, त्या करताना दिसत नाहीत आणि कौरव काय आणि पांडव काय? त्या वाटेल ते बोलतात. त्यांच्याबाबत मला काही बोलायचे नाही.
महिला आयोगाची एक बैठक झाली. मागे घडलेल्या गोष्टींवर न बोलता यापुढे महिला आयोगाने कसं काम करावं. एसओपी कशा असाव्यात, त्यासाठी काय बदल करण्यात यावेत, याबाबततच्या सूचना सर्वांनी केल्या. या बैठकीत राजकारणासाठी कोणीही टीका केली नाही. पण असंख्य सूचना आल्या मांडण्यात आल्या, असेही महिला अयोगाच्या बाबत दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानिया म्हणाल्या, महिला आयोगाकडे आतापर्यंत अनेक तक्राारी प्रलंबित आहेत, त्यांची चौकशी केली पाहिजे. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या तक्रारी असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर काम का केले नाही. त्याचा डेटा जमा करून तो गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला पाहिजे. तक्रार आल्यानंतर पहिला प्रीलिमिनरी रिपोर्ट सात दिवसांत गेला पाहिजे. इंटरिम रिपोर्ट १४ दिवसांत, तर फायनल रिपोर्ट पाठवून नव्वद दिवसांत चार्जशीट दाखल झाले पाहिजे. त्यासाठी प्रोटोकल बनविण्याबाबत चर्चा झाली.
आज ही पहिली आणि शेवटची बैठक नसणार नाही. यानंतरच्या पुढच्या बैठकीला सर्वांना बोलविण्यात येणार आहे, असे या वेळी नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे. कोणावरही वैयक्तीक टीका न करता त्यांच्या कामाबाबत बोललं पाहिजे. ज्या चुका झाल्या आहेत, त्या चुकांबद्दल आम्ही तोंडावर बोललो. समोरासमोर बोलण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. पण, वैयक्तिक पातळीवर टीका करणे थांबवले पाहिजे.
वाल्मीक कराड केसवर बारकाईने लक्ष ठेवणार : दमानिया
वाल्मीक कराडच्या केसकडे मी यापुढे बारकाईने लक्ष ठेवणार आहे. पुढील सुनावणी १७ जून रोजी होणार आहे, त्यापूर्वी धनंजय देशमुखांशी मला अनेक गोष्टींवर बोलायचे आहे. त्यासाठी मी त्यांना निरोप पाठवला आहे की, आपण एकदा भेटून त्यावर बोलू. मला ज्या अनेक गोष्टी मांडायच्या आहेत, त्या मी त्यांच्याकडे देणार आहे, असेही अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.