Abdul Sattar News : अब्दुल सत्तार भाजपचा खेळ बिघडवणार ? बागडे नानांच्या फुलंब्रीत बंडाची तयारी

Will Minister Abdul Sattar spoil BJP's game in Phulumbri Assembly Constituency : अब्दुल सत्तार यांनी बलांडे यांच्यासाठी भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. मतदारसंघ शिवसेनेला सुटला नाही, तर किशोर बलांडे हे अपक्ष निवडणूक लढवतील आणि आम्ही त्यांना निवडून आणू, असा दावा केला.
Phulambri Assembly Constituency
Phulambri Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

नवनाथ इधाटे

Vidhansabha Election 2024 : मंत्री अब्दुल सत्तार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक मतदारंसघात भाजपचा खेळ बिघडवणार? असे दिसते. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सत्तार यांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर आता ते देखील `करारा जवाब` देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे भोकरदन-जाफ्राबादचे विद्यमान आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघात जाऊन सुपडा साफ करण्याचा इशारा अब्दुल सत्तार यांनी काही दिवसापुर्वी दिला होता.

त्यानंतर सत्तार यांनी आपला मोर्चा आता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाकडे वळवला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक किशोर बलांडे यांना विधानसभेसाठी बळ देणे सुरू केले आहे. शिवसेनेकडून वर्षभरापासून बलांडे हे फुलंब्रीतून विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आणि हे तीनही पक्ष विधानसभा निवडणुक एकत्रित लढवणार असल्याने बलांडे यांची अडचण होणार आहे.

मात्र अब्दुल सत्तार यांनी बलांडे यांच्यासाठी भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. मतदारसंघ शिवसेनेला सुटला नाही, तर किशोर बलांडे हे अपक्ष निवडणूक लढवतील आणि आम्ही त्यांना निवडून आणू, असा दावा अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे केला आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांचा राजकीय वारस कोण ठरणार? यासाठी पक्षात डझनभर इच्छुकांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. असे असतांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अचानक आपला मोर्चा फुलंब्रीकडे वळवला आणि थेट बंडाची भाषा सुरू केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

Phulambri Assembly Constituency
Governor Haribhau Bagde : राजस्थानच्या राजभवनात बागडेनानांचा मराठी बाणा..

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी अब्दुल सत्तार यांनी 25 कोटींचा निधी दिला. यातून केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांचे भुमीपूजन आज सत्तार (Abdul Sattar) यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या बिनधास्त आणि सडेतोड बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी भाजपकडे असलेल्या फुलंब्री विधानसभेच्या जागेवर दावा सांगितल्याचे स्पष्ट करतानाच किशोर बलांडे हे आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेनेला ही जागा मिळाली नाही, तर बलांडे अपक्ष लढतील आणि माझ्या पेक्षाही मोठ्या अदृश्य हातांच्या मदतीने ते विजयी होतील आणि विधासभेत माझ्यासोबत बसतील, असा दावा सत्तार यांनी केला. किशोर बलांडे यांना मतदारसंघासाठी दिलेला पंचवीस कोटींचा निधी म्हणजे `बयाना` आहे. किशोर बलांडे यांच्या काम करण्याची पद्धत मला माहिती आहे, तुम्हाला जर त्यांच्या कामाची झलक पहायची असेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन सत्तार यांनी आपल्या भाषणात केले.

Phulambri Assembly Constituency
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी सुरूच

मी किशोर बलांडे यांना शब्द दिला असून फुलंब्री विधानसभेसाठी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मी दिलेला शब्द नेहमीच पाळतो. त्यामुळे चिन्ह नाही मिळाले तर ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत, असेही सत्तार यांनी जाहीर करून टाकले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बलांडे यांच्या पाठीशी मोठ्या अदृश्य शक्तीचे हात असून या निवडणुकीत ते लढणार आणि जिंकणारच, असा दावा सत्तार यांनी केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. आता ही अदृश्य शक्ती म्हणजे जालन्याचे काँग्रेस खासदार डाॅ. कल्याण काळे की मग मराठा आरक्षण आंदोलनक मनोज जरांगे पाटील? अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com