संजय शिरसाटांच्या मनात नक्की चाललंय तरी काय? ट्विट करत उद्धव ठाकरेंचा कुटूंबप्रमुख म्हणून उल्लेख

Sanjay Shirsat|Uddhav Thackeray|संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा
Sanjay Shirsat|
Sanjay Shirsat|
Published on: 
Updated on: 

मुंबई : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेनेला रामराम केला आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले. पण शिंदे गटात सामील होऊनही शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्री पदाच्या यादीत ऐन वेळी अब्दुल अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांची नवे घेतल्याने संजय शिरसाट यांच नाव मंत्रीपद हुकले, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

त्यातच आता संजय शिरसाट नाराज असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट( Sanjay Shirsat Tweet) केलं. या ट्विटमध्ये त्यांनी 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतचं त्यांनी विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषणही जोडलं होतं. पण काही मिनिटांतच त्यांनी हे ट्वीट डिलीटही केलं. यामुळे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला एक प्रकारे इशारा तर दिला नाही ना,अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

संजय शिरसाट यांनी डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट
संजय शिरसाट यांनी डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिरसाट काल पहिल्यांदा औरंगाबादमध्ये पोहोचले. तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार अजून पूर्ण झालेला नाही, त्यांनी मला मंत्रीपद नक्की मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी मंत्रिमंडळाच्या यादीतून तुमचं नाव कोणी काढलं, असं विचारल्यावर मिश्किलपणे उत्तर देत शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही यादीतून माझं नाव कापलं गेलं होतं आणि याही वेळी काढलं गेलं. मात्र येत्या काही दिवसात निश्चितपणे मला मंत्रीपद मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मला विश्वास आहे, असं संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com