NCP : चुकीला माफी नाही! अजितदादांच्या 'राष्ट्रवादी'ने उचललं मोठं पाऊल, बापू भेगडेंसह आठ जणांवर कारवाई

Maharashtra Assembly Election NCP uspended rebels : पक्षांच्या उमेदवारांविरोधात नामांकन भरत पक्षविरोधी भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
NCP Vidhan Sabha 2024 candidate List | Ajit Pawar
NCP Vidhan Sabha 2024 candidate List | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP News : महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. भाजपने तब्बल 40 जणांवर कारवाई केली. तर, काँग्रेसने पाच बंडखोरांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मोठे पाऊल उचलेले आहे.

महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या तब्बल आठ जणांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातून निलंबित केले आहे.

बापू भेगडे, कृष्णा कंधारे, विश्वंभर पवार, ज्ञानेश्वर बामरे, पुजा व्यवहारे, ममता शर्मा, धनेंद्र तुरकर, आनंद सिंधीकर या आठ जणांना पक्षातून निलंबित करण्यत आले आहे.बापू भेगडे हे मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात लढत आहेत.

NCP Vidhan Sabha 2024 candidate List | Ajit Pawar
Kokan Politics: प्रचारासाठी अवघे 12 दिवस शिल्लक; आघाडीमध्ये निराशा, तणाव; कोकणात काय चाललंय...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघातील तिकीट वाटप केले आहे. तथापि, काही पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षांच्या उमेदवारांविरोधात नामांकन भरत पक्षविरोधी भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

अजित पवारांच्या आदेशाने कारवाई

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार याबंडखोर पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याचे पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

NCP Vidhan Sabha 2024 candidate List | Ajit Pawar
Caste Census : जातनिहाय जनगणनेबाबत काँग्रेसचे मोठे पाऊल; 1931 नंतर पहिल्यांदाच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com