Maharashtra Assembly Election 2024 : डॉ. योगेश क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे प्रामाणिक काम केल्यामुळे आता भाजप पुर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभा असेल आणि त्यांच्या विजयात भाजपचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केला. डॉ. प्रितम मुंडे यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी बीडमध्ये प्रचारसभा घेतली.
यावेळी उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस ॲड. सर्जेराव तांदळे, डॉ. सारिका क्षीरसागर, चंद्रकांत फड, अजय सवाई, (Beed News) नवनाथ शिराळे, जगदीश गुरखुदे, अशोक लोढा, संगिता धसे, सलीम जहांगीर, देविदास नागरगोजे, जालिंदर सानप, वैजनाथ मिसाळ, विक्रांत हजारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने उच्चशिक्षित, संयमी उमेदवार लाभला आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत कुठलेही किंतू-परंतु न करता प्रामाणिकपणे पंकजा मुंडे यांचे काम केले. (Pritam Munde) आता त्यांच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीने काम करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत.
डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधानसभेत पाठवायचे आहे, असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी केले. यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आता त्यांना विजय करण्यासाठी जीवाचे रान करू, असा शब्द भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक `घडी` बसविण्याची `वेळ`आली आहे. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्याकडून कायम सन्मानाची वागणूक मिळेल, अशी ग्वाही यावेळी डॉ. क्षीरसागर यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.