Uddhav Thackeary Birthday News : सत्ता येते जाते, पण स्वाभिमान टिकला पाहिजे, ही उद्धवसाहेबांची शिकवण घेऊनच आम्ही वाटचाल करत आहोत. उद्धवसाहेब तुम्हाला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा पाहण्याची माझ्यासह जनतेची इच्छा आहे, अशा शब्दात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोना काळात तुम्ही या महाराष्ट्राला आधार दिलात, एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाने जनतेची काळजी घेतलीत, असेही ओमराजे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) साहेब यांचा आज वाढदिवस.
उद्धवजी ठाकरे साहेब हे सत्तेत असताना सामान्य माणसाला देखील आपल्या कुटुंबातील व्यक्तीच मुख्यमंत्री आहे असे वाटत. त्यांनी राज्यकारभार अतिशय पारदर्शक पद्धतीने चालविला. त्यांच्याशी झालेला दगा हा महाराष्ट्र विसरलेला नाहीये व लवकरच त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून बघण्यासाठी माझ्यासह सर्व राज्यातील जनता उत्सुक आहे.
सत्ता येते जाते पण स्वाभिमान टिकला पाहिजे ही उद्धव साहेबांची शिकवण घेऊनच आम्ही देखील वाटचाल करत आहोत. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा शब्दात ओमराजे (Omraje Nimbalkar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे धाराशिवमधून तब्बल तीन लाख 37 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. पक्ष फुटला तेव्हा ओमराजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. संकटात पक्ष आणि नेत्याला सोडणे माझ्या रक्तात नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
उद्धव ठाकरे यांनी ओमराजे यांना धाराशिवमधून दुसऱ्यांदा उमेदवारी देत निष्ठेचे फळ दिले. मतदारांनी ओमराजे यांच्यावर अक्षरशः मतांचा पाऊस पाडला. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने भाजपचे मिशन 45 उधळून लावले.
राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाची आजही आठवण काढली जाते. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना खासदार ओमराजे यांनी ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.