Omraje Nimbalkar Vs Archana Patil: अर्चना पाटील यांची खेळी अयशस्वी; ओमराजे यांना मोठा दिलासा

Dharashiv News No crime registered against shiv sena mp omraje nimbalkar: अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ओम्बासे यांच्याकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती.
Archana Patil, Omraje Nimbalkar
Archana Patil, Omraje NimbalkarSrakarnama
Published on
Updated on

धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभवाची धूळ चारली आहे. तीन लाखांहून अधिक मताधिक्क्यांनी ओमराजे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न अर्चना पाटील यांनी केला होता. पण त्यांची ही राजकीय खेळी अयशस्वी झाली असल्याचे बोलले जाते.

अर्चना पाटील यांनी त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. पण ओमराजे यांना दिलासा मिळाला आहे. ओमराजे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद होणार नाही, असा आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.

ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) आणि त्यांचे सहकारी आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात मुक्त संचार केल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश डॉ. सचिन ओम्बासे (Sachin Ombase) यांनी काढले होते. या आदेशात आता दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ओमराजे आणि कैलास पाटील यांच्यावर गुन्हा नोंद होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Archana Patil, Omraje Nimbalkar
Dhule Politics: 'सेटलमेंट' वरुन आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली; धुळ्याचा विकास कुणी केला?

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारीओम्बासे यांच्याकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या तक्रारीनंतर ओमराजेंच्या अडचणीत वाढ होण्याचे चित्र होते. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अर्चना पाटलांनी ओमराजे यांच्याविरोधात ही खेळी खेळल्याची चर्चा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com