Abdul Sattar Met Imtiaz Jaleel : बडे मियाॅं अब्दुल सत्तार, छोटे मियाँ इम्तियाज जलील यांच्या घरी ; बंद दाराआड चर्चा..

Abdul Sattar Met Imtiaz Jaleel : गाडीत बसतांना अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज व त्यांचा मुलगा बिलाल याच्याकडे पाहत व्रजमुठ आवळत सूचक संकेतही दिले. जिल्ह्याच्या राजकारणात `छोटे मियाॅ, बडे मिया` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन नेत्याची गुप्त भेट महत्वाची समजली जात आहे.
Minister Abdul Sattar-EX MP.Imtiaz Jaleel
Minister Abdul Sattar-EX MP.Imtiaz JaleelSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-AIMIM Political News : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांची सत्तार यांनी काल (ता.29) रोजी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. गळाभेट, हस्तांदोलन आणि बराचवेळ बंद दाराआड चर्चा केल्यानंतर दोघेही हसत हसत बाहेर पडले.

गाडीत बसतांना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी इम्तियाज व त्यांचा मुलगा बिलाल याच्याकडे पाहत व्रजमुठ आवळत सूचक संकेतही दिले. जिल्ह्याच्या राजकारणात `छोटे मियाॅ, बडे मिया` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन नेत्याची हे गुप्त भेट महत्वाची समजली जात आहे. नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांचा पराभव झाला.

पण महायुती विरोधात खरी लढत दिली ती इम्तियाज जलील यांनीच. शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी एकगठ्ठा मराठा मतांवर विजय मिळवत सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य घेतले. तर इम्तियाज जलील यांना मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. आगामी विधानसभा निवडणुका पाहता अब्दुल सत्तार-इम्तियाज जलील यांच्यात झालेली भेट नव्या राजकीय खेळीची सुरूवात समजली जात आहे.

Minister Abdul Sattar-EX MP.Imtiaz Jaleel
Video Abdul Sattar News : अब्दुल सत्तारांच्या शुभेच्छा जाहिरातीवर इम्तियाज जलील, कल्याण काळे यांचे फोटो; सावे संतापले

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) 2019 मध्ये खासदार म्हणून निवडून आले, तेव्हा सत्तार यांनी त्यांच्या विजयात आपला देखील वाटा होता, असे जाहीरपणे सांगितले होते. तर इम्तियाज जलील यांनी `अब्दुल सत्तार मेरे बडे भाई है, और वो मुझे कभी हारने नही देंगे` असे म्हणत त्यांच्याशी असलेल्या मैत्रीची कबुली अनेकदा दिली होती.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह महाराष्ट्रात मुस्लिम मतदार महाविकास आघाडीकडे वळल्याचे स्पष्ट झाले होते. याचा मोठा फटका महायुतीला विशेषतः मराठवाड्यात बसला. छत्रपती संभाजीनगर वगळता सातही लोकसभा मतदारसंघात महायुतीला पराभवाचे तोंड पहावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी शिवसेनेचे नेते म्हणून अब्दुल सत्तार घेताना दिसत आहेत.

Minister Abdul Sattar-EX MP.Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel News : पराभव झाला तरी इम्तियाज जलील यांनी 'आदर्श'च्या ठेवीदारांची सोडली नाही साथ !

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ऐकमेकांना सहाय्य करण्याची रणनिती या दोन नेत्यांनी आखल्याची चर्चा आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडे सिल्लोडसह कन्नड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्या आली आहे. शिवाय जिल्ह्यातील उमेदवार देण्याच्या प्रक्रियेतही अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

दुसरीकडे लोकसभेला पराभव झाल्यानंतर इम्तियाज जलील मध्य मतदारसंघातून पुन्हा विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तार-इम्तियाज यांच्या भेटीकडे सहज झालेली भेट म्हणून पाहण्याची चूक त्यांचे विरोधक करणार नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या भेटीत त्या संदर्भातही चर्चा झाल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com