बॉम्ब फोडण्याच्या फडणवीसांच्या इशाऱ्यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री टेन्शनमध्ये

संतापलेले फडणवीस हे नेमके कोणत्या मंत्र्यांच्या अंगणात बॉम्ब फोडणार आणि कोणाच्या कानठळ्या बसवणार
Devendra Fadnavis-Nawab Malik
Devendra Fadnavis-Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आर्यन खानच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्संख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री टेन्शनमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मालिका यांच्या आरोपामुळे संतापलेले फडणवीस हे नेमके कोणत्या मंत्र्यांच्या अंगणात बॉम्ब फोडणार आणि कोणाच्या कानठळ्या बसवणार, याची चर्चा रंगली आहे. (Minister in Thackeray government in tension due to Fadnavis' hint of bomb blast)

आर्यन खान प्रकरणात ठाकरे सरकार आणि विरोधकांत रोज नवा वाद रंगला जात आहे. ड्रग्ज प्रकरणावरून नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या एका गाण्याला ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याने अर्थपुरवठा केल्याचा आरोप केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना वरील उत्तर दिले होते. नवाब मलिक सध्या लवंगी फटाके फोडत आहेत. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीस दिला होता.

Devendra Fadnavis-Nawab Malik
ही फक्त सुरुवात आहे...आर्यन खान प्रकरणाचा तपास वानखेडेंकडून काढल्यानंतर मलिकांचे सूचक ट्विट

नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ‘अंडरवर्ल्ड’ शी संबंध असल्यावरून आरोप-प्रत्यारोपाची धार तीव्र झाली आहे. मालिक यांनी लवंगी फटका लावल्याचे सांगत, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी विरोधकांमधील वादात भर पडण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चौकशा सुरू आहेत. यामुळे ठाकरे सरकार आणि भाजपमधील संघर्ष वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात फडणवीस यांनी थेट इशाराच दिल्याने नेमके काय होणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis-Nawab Malik
माझी बदली झाली नसून मी मुंबई एनसीबीच्या झोनल डायरेक्टर पदावर कायम : समीर वानखेडे

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनीही नवाबही बेनकाब होता है, असा इशारा दिला होता. तसेच मलिकांच्या आरोपानांनतर त्या गाण्याच्या नावातून ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याचे नाव हटविण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com