Krishna Andhale News : फरार कृष्णा आंधळेचा खून झाला असावा, मंत्र्यानेच व्यक्त केली भीती

Sanjay Shirsat suspects Krishna Andhale murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, हत्येमध्ये सहभागी असलेला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. हत्येला तीन महिने झाले तरी पोलिस त्याला अटक करू शकले नाहीत.
walmik karad Krishna Andhale
walmik karad Krishna Andhale sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Shirsat News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिनेत होत आहेत. या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे. मात्र,हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधले अद्यापही फरार आहे. तीन महिन्यानंतर देखील पोलिस त्याला शोधू शकले नाहीत.

कृष्णा आंधळे सापडत नसल्याने तो जिवंत आहे की नाही, याबदद्ल मला शंका आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत मात्र तो सापड नाही त्यामुळे त्याचा खून झाला असावा, अशी शंका मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्यानंतर मुंडे यांनी प्रकृती कारण देत आपला राजीनामा दिला. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांना देखील सहआरोप करण्याची मागणी होत आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, सरकार या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाही. त्यामुळं कारवाई करणे योग्य नाही. तपासात थोडा जरी सहभाग आढळून आला तर कारवाई केली जाईल असे शिरसाट यांनी सांगितले.

walmik karad Krishna Andhale
Atul Save-Sanjay Shirsat News : सावे-शिरसाट यांच्या दाव्यांवर प्रशासनाकडून 'पाणी', नियमित पुरवठ्यासाठी नवी डेडलाईन!

महायुतीचे आमदार छावा सिनेमा पाहणार होते. त्यावरून गद्दारांनी बघितलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर संजय शिरसाट यांनी ठाकरेंनी स्वतः छापा सिनेमा बघायला पाहिजे. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली आहे, असे म्हटले तसेच आम्ही छावा सारखे लढल्याचे देखील शिरसाट म्हणाले.

आदिती तटकरे यांनी छावा सिनेमाचे आयोजन केले होते. मात्र, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील आमदार हा सिनेमा पाहण्यासाठी गेले नाहीत. त्यावर बोलताना शिरसाट म्हणाले, अदिती तटकरे यांनी बोलावले म्हणून आम्ही गेलो असे नाही तर अनेकांनी छावा चित्रपट बघितला आहे त्यामुळे कोणी चित्रपट बघण्यासाठी गेलो नाही.

वाल्मिक कराड विरोधात आंदोलन

धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली असून वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन करत आहे. राज्यभर ठिकाठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

walmik karad Krishna Andhale
Raigad Guardian Minister : तटकरेंनी बालहट्ट सोडावा अन्यथा राज्यभर रायगड पॅटर्न राबवू; महायुतीत वादाची ठिणगी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com