Abdul Sattar News : सत्तासंघर्षावरील निकालाआधीच मंत्री सत्तारांचं मोठं विधान;म्हणाले,''आता आमचे कॅप्टनच...''

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ''सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्ही हसता खेळता मान्य करू..''
Abdul Sattar News
Abdul Sattar Newssarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मागील वर्षी जून महिन्यात उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली असून पुढील काही दिवसांत निकाल येण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यात सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आले असतानाच शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील मुख्यमंत्री बदलाविषयी संजय राऊतांचं विधान,अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा यांसारख्या अनेक घडामोडींनी राज्याचं राजकारण पूर्णत: ढवळून निघालं आहे

Abdul Sattar News
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

याचवेळी कायदे अभ्यासक आणि वकील असीम सरोदे(Asim Sarode) यांनी येत्या 11 किंवा 12 मे ला सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या निकालातून राजकारणात धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिक दौऱ्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सूचक वक्तव्य केलं आहे. सत्तार यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांना आपल्या पक्षाचे कॅप्टन म्हणत आता आमचे कॅप्टनच गेले तर बाकी काही बघण्याचा प्रश्नच नाही. आता त्या 16 आमदारंमध्ये मी देखील आहे. राजकारणात प्लॅन A , प्लॅन B असतो. पण प्लॅनप्रमाणेच सर्व घडते असं काही नाही असं खळबळजनक विधान केलं आहे.

Abdul Sattar News
Shiv Sena News : पिंपरी-चिंचवडमधील ठाकरे गटाचा नेता शिवसेनेच्या गळाला

आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार...

आम्ही गेलो तरी इतिहास राहणार. आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार. आमचे पन्ने नाही, इतिहासात लिहिला जाणार. हा निर्णय देशासाठी लागू होईल असंही सत्तार यांनी यावेळी सांगितलं.

मी कुत्रा निशाणीवर लढलो तरी...

अब्दुल सत्तार यांनी सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)चा निकाल आम्ही हसता खेळता मान्य करू असं म्हटलं आहे. तसेच मला काही निकालाची धास्ती नाही. आपली लोकल गाडी. हात दाखवा गाडी थांबवा. मी कुत्रा निशाणीवर लढलो तरी सत्तार आमदार पक्का असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं.

Abdul Sattar News
Amol Kolhe On Sharad Pawar Retirement : 'अध्यक्षपद सोडण्यामागील शरद पवारांच्या भावनाही समजून घेणे महत्वाचे!'

सत्तार अधिकाऱ्यावर भडकले

सत्तार म्हणाले, मी सकाळी सातला दौरा सुरू करतो. विजय दौंड या अपंग शेतकऱ्याला अधिकाऱ्याने कोणालाही सांगा पंचनामा होणार नाही असे दुरूत्तर केल्याची माहिती मिळाली. त्यावर सत्तार चांगलेच भडकले. शेतकऱ्यांबाबत कोणताही अपमान सहन केला जाणार नाही. आम्ही प्रशासनाच्या पाठीशी आहोत, मात्र तुम्ही देखील शेतकऱ्यांशी नीट वागा अशा शब्दांत संतप्त सत्तारांनी कृषी अधिकार्यांना खडेबोल सुनावले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com