Mission 12 : 'मिशन 12', ठाकरे-पवारांना धक्का देण्याची तयारी,'तृणमूल'नंतर गणित बदलले!

Sharad Pawar Uddhav Thackeray Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात 'मिशन 12' चर्चेत आले आहे. तब्बल 12 खासदार फोडण्याची चर्चा होती. मात्र, तृणमूलमधील बंडानंतर सर्वच राजकीय चित्र बदलले आहे.
Sharad Pawar Uddhav Thackeray Eknath Shinde
Sharad Pawar Uddhav Thackeray Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाच देखील हादरा बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्टिव्ह झाले असून दिल्लीत नुकतीच त्यांनी बैठक घेत ठाकरेंचे सात खासदार फोडण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील देखील खासदार फोडण्याची चर्चा शिवसेनेकडून करण्यात आली होती. ऑपरेशन 'तुतारी'चा उल्लेख शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात होता. महाराष्ट्रातून तब्बल 12 खासदार फुटण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, शरद पवारांचे खासदार फुटणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ऑपरेशन तुतारीला ब्रेक लागला होता.

तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेली फूट पाहता पुन्हा महाराष्ट्रात 'मिशन 12' अ‍ॅक्टिव्ह होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांनंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सावध आहे. प्रत्येक खासदार त्यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

मागील काही महिन्यांपासून प्रत्येक खासदारकडे पक्षाचे बारकाईने लक्ष आहे. त्यांच्या अडअडचणी समजून घेतल्या जात आहेत. तृणमूलमधील बंडखोरीनंतर महाराष्ट्र असे काही घडणार नसल्याचे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्व सेफ आहे. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यासाठी शिंदे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

Sharad Pawar Uddhav Thackeray Eknath Shinde
Maharashtra Politicse : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, उद्धव ठाकरेंचे सात खासदार फुटणार, मंत्रिपदाची डील फायनल; एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक

दिल्लीत बैठक, मंत्रिपद फिक्स?

मराठी वृ्त्तपत्र पुढारीने दिलेल्या वृत्तीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविवारी (सात जून) ठाकरेंच्या खासदारांची बैठक दिल्लीत घेतली. या गुप्त बैठकीत सात खासदारांना सोबत घेण्यात त्यांना यश आले आहे. मराठवाड्यातील खासदाराला मंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व शक्यता संजय राऊत यांनी फेटाळल्या आहेत.

Sharad Pawar Uddhav Thackeray Eknath Shinde
Eknath Shinde Shivsena: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका? आष्टीकर, वाजेंनंतर 48 तासांतच ठाकरेंचा तिसरा खासदारही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

NCP MP Bajrang Sonawane reacts to speculation over Sharad Pawar's party joining the NDA, asserting that all party MPs remain united.
Prithviraj chavan uddhav Thackeray Sharad Pawar .jpg
Sharad Pawar
Bhaskar Bhagre, Sharad Pawar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com