Anna Bansode Video: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंची आमदारकी धोक्यात? 2 एप्रिलला हायकोर्टात लागणार निकाल!

MLA Anna Bansode Vs Sulakshana Shilwant Dhar : अण्णा बनसोडेंनी विधानसभा निवडणुकीत सुलक्षणा शिलवंत धर यांचा तब्बल 36 हजार 698 मतांनी पराभव केला होता. मात्र, बनसोडे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे.
Anna Bansode
Anna Bansodesarkarnama
Published on
Updated on

Anna Bansode News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची दोनच दिवसांपूर्वी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोनच दिवसांमध्ये अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण त्यांच्या आमदारकीला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. कोर्टाने बनसोडे यांना दोन एप्रिलाल हायकोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश जारी केले आहेत.

Anna Bansode
Kunal Kamra Controversy : "शिंदेंचे नेते रेड्याचं पण दूध..."; कुणाल कामराची पाठराखण करताना राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अण्णा बनसोडे यांनी निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेतून सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केला आहे. अण्णा बनसोडेंनी विधानसभा निवडणुकीत सुलक्षणा शिलवंत धर यांचा तब्बल 36 हजार 698 मतांनी पराभव केला होता.

अण्णा बनसोडेंची राजकीय वाटचाल

अण्णा बनसोडे हे विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष तसेच पिंपरीचे विद्यमान आमदार आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द पिंपरी-चिंचवड महापालिकेतून नगरसेवक म्हणून सुरू झाली होती. त्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे.

2009 मध्ये ते पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर आमदारा म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर 2014 ला त्यांना शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, 2019 आणि 2024 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवत तिसऱ्यांदा आमदार झाले होते.

Anna Bansode
Sushma Andhare Video : ब्राम्हण व्यक्तीवर मुस्लिम व्यक्तीच्या मदतीने अंत्यसंस्कार; सुषमा अंधारे म्हणाल्या, 'नितेश राणेंसारखी माणसं...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com