Sushma Andhare Video : ब्राम्हण व्यक्तीवर मुस्लिम व्यक्तीच्या मदतीने अंत्यसंस्कार; सुषमा अंधारे म्हणाल्या, 'नितेश राणेंसारखी माणसं...'

Sushma Andhare Criticized Nitesh Rane : सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, सुधीर किंकळे हे मृत्यू पावले. घरात फक्त ते आणि त्यांचे बहीण जयश्री किंकळे. त्याही थकलेल्या. अंत्यविधी कोणी करायचे. सायंकाळी इफ्तारीच्या वेळेत ही बातमी जावेदभाईंना कळते.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : मंत्री नितेश राणेंचे मुस्लिमांविषयीचे वादग्रस्त वक्तव्य, नागपूरमधील दंगल, राजापूरमध्ये मशि‍दीसमोर झालेला वाद आणि त्यानंतर राहुरीमधील तणावग्रस्त परिस्थिती या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित होते की काय? अशी चर्चा होती.

मात्र, पुण्यामध्ये एका हिंदू व्यक्तीवर मुस्लिम समाजातील व्यक्तीच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्याच आल्याचे समोर आले. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंत्यसंस्कारासाठी मदत करणारे जावेद यांची स्तुती करत मंत्री नितेश राणे यांना टोला लगावला.

अंधारे यांनी फेसबूकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'नितेश राणे सारखी काही माणसं घसा फोडून हिंदू मुस्लिम करत राहतील. इथली गाव गाड्याची वीण उसवण्याचा प्रयत्न करतील. पण ही माती इतकी कमजोर नाही की अशा फुटीरतावादी प्रयत्नांना खतपाणी घालेल.'

Sushma Andhare
Mahayuti Politics : अजितदादांच्या बालेकिल्ल्यावर शिंदेसेनेचा डोळा; बड्या नेत्याचा शिवतारेंना सल्ला, ‘राजकारणात काहीही होऊ शकतं; शिवसेनेचे आमदार...’

अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, '286 रास्ता पेठ पुणे येथील 70 वर्षाचे सुधीर किंकळे हे मृत्यू पावले. घरात फक्त ते आणि त्यांचे बहीण जयश्री किंकळे. त्याही थकलेल्या. अंत्यविधी कोणी करायचे. सायंकाळी इफ्तारीच्या वेळेत ही बातमी जावेदभाईंना कळते... काय करावं... नमाजसाठी थांबावं की मानवतेचा हा धर्म पाळावा... जावेद भाई थेट डेडबॉडी घेण्यासाठी ससून हॉस्पिटल ला गेले. मात्र आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्ता नंतर अंत्यविधी करता येत नाही असे जयश्रीताई किंकळे यांनी सांगितले.'

आपल्या पोस्टमध्ये अंधारे यांनी सांगितले की, 'अत्यंत एकाकी पडलेल्या त्या माय माऊलीला रडू कोसळले. जावेदभाईच्या समोरचा प्रश्न की रमजानच्या महिना चालू आहे आणि सकाळी अंत्यविधी करायचे म्हणजे आता सकाळची नमाजही जाणार आहे.

परंतु क्षणाचाही न विचार करता जावेदभाईंनी आणि त्यांच्या उमत या सामाजिक संस्थेने दुसऱ्या दिवशी सकाळीच्या अंत्यविधीची सगळी तयारी केली आणि जयश्रीताईंचे कुटुंबीय म्हणून या अंत्यविधीतले हिंदू धर्म पद्धतीनुसारचे सगळे सोपस्कार पार पाडले...'

सुषमा अंधारे जावेद भाई , तुमची बहीण म्हणून मला तुमचा प्रचंड अभिमान आहे, असे म्हटले आहे. तसेच आपल्या पोस्टला रमजान, सच्चा मुसलमान ह्युमॅनिटी फर्स्ट असे टॅग दिले आहेत.

Sushma Andhare
chandrakant patil : अजितदादांच्या शिलेदाराच्या भाजप प्रवेशाला चंद्रकांत पाटलांचा ‘ग्रीन सिग्नल’; संजयकाकांच्या घरवापसीचे संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com