Pune News : आपल्या मुलाचे अपहरण करून त्यांच्याकडून दहा कोटींची खंडणी मागण्यात आली, असा आरोप शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी केला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अशोक पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचे पुत्र ऋषीराज पवार हे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे प्रचार करीत होते. यावेळी 4 ते 5 जणांच्या टोळक्याने त्यांचे अपहरण करून त्यांना 10 कोटींच्या खंडणीची मागणी केली.
आपल्याला जबरीने विवस्त्र करून तिथे एका स्त्रीला आणून तिला विवस्त्र करून फोटो काढण्यात आल्याचा आरोप देखील ऋषीराज यांनी केला आहे. तसेच आपले काही फोटो व्हायरल देखील करण्यात येत असल्याचे ऋषीराज यांनी सांगितले.
याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अॅड. असीम सरोदे म्हणाले, शिरूर हवेली मतदारसंघात अशोक पवार विरुद्ध माऊली कटके अशी लढत आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवली गेली पाहिजे मात्र अशोक पवारांच्या मुलासोबत दुर्दैव प्रसंग झाला आहे. अशोक पवार Ashok Pawar यांचा एक कार्यकर्ता, भाऊ, कोळपे आणि ऋषीराज पवार एका ठिकाणी मिटिंगला गेले होते.त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले.
ऋषीराज यांना विवस्त्र केले आणि त्या ठिकाणी एका बाईला विवस्त्र करून दोघांचे फोटो काढले. त्यानंतर 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यावेळी ऋषिराज यांनी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत बाहेर गेल्यावर देत म्हणून सुटका कर।घेतली . आता त्यातील काही फोटो व्हायरल झाले असल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले. याबाबतची तक्रार दाखल करण्यात येत असून पोलिसांकडून Police त्याला विलंब होत असल्याचे देखील सरोदे यांनी सांगितलं.
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे, याची निवडणूक आयोगाने दखल घेणे आवश्यक आहे. ही भयानक घटना आहे. यामुळे ऋषीराज प्रचंड मानसिक तणावात आहे. निवडणूकीसाठी असे केले जात आहे, असा आरोप सरोदे यांनी केला.
अशोक पवार म्हणाले, अतिशय घृणास्पद असा हा सर्व प्रकार आहे. माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याला विवस्त्र करून एका स्त्री सोबत फोटो काढण्यात आले. त्याच्याकडून दहा कोटींची खंडणी मागण्यात आली. त्यांचा पराभव त्यांना समोर दिसत आहे म्हणून हे सगळं सुरू आहे. त्याला फसवून हे सगळं केलं. पोलिसांनी तपास करावा याचा मागे कोण आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.