Rohit Pawar : रोहित पवारांनी अंग काढणाऱ्या सरकारला सुनावलं, म्हणाले, 'दिलेला शब्द पाळावाच लागेल'

maharashtra budget 2025 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार महायुतीचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अपेक्षा असतानाच रोहित पवारांनी सरकारला छेडलं आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. आज (ता. 10) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महायुतीचा पहिला अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार आहे. पण याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाने आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत? हे सांगताना सरकारला छेडलं आहे. तसेच त्यांनी महायुतीला त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे.

राज्याचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होत असून अजित पवार 11 वा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर आज नवा विक्रम नोंद होणार आहेत. याच अर्थसंकल्पाकडून जनतेला खूप अपेक्षा असून या अर्थसंकल्पात हे सरकार आपल्या आश्वासनांची पूर्तता करणार का याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. याकडेच शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधत महायुतीला आश्वासनांची आठवण करून दिली आहे.

रोहित पवार यांनी, “आमचा मुद्दा एकमेव असून निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण करावीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींच्या मदतीत वाढ करताना 2100 रूपये द्यावेत. महिला सुरक्षेची बाब महत्वाची असून बेरोजगार तरुणांसाठी स्टायपेंड सुरू करण्याची मागणी केलीय.

Rohit Pawar
Maharashtra Budget 2025: संभाजी महाराजांसोबत तुलना करणं अनिल परबांना महागात पडणार; निलंबनासाठी सत्ताधारी आक्रमक

आमदार रोहित पवार यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली असून त्यांनी याबाबत प्रसारमाध्यमांवर देखील मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी, लिहिले आहे की, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देणं क्रमप्राप्त आहे. या आश्वासनांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना, आश्वासनांची यादी टाकली आहे.

1) लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रु.

2) महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांची पोलीस भरती.

3) शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला 15 हजार रु.

Rohit Pawar
Maharashtra Budget Session 2025: विरोधक सत्ताधाऱ्यांना 'सळो की पळो' करुन सोडणार! 'या' चार मुद्दांनी अधिवेशन तापणार

4) MSP वर 20 टक्के अनुदान.

5) वृद्धांना महिन्याला 1500 रुपये वरून 2500 रुपये.

6) अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रु. मानधन आणि विमा संरक्षण.

7) १० लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com